पोलिस वृत्त एकत्रित

पोलिस वृत्त एकत्रित

84713
...
विषारी द्रव प्यायलेल्या
रिक्षाचालकाचा मृत्यू

कोल्हापूर ः आणखी एका रिक्षाचालकाचा आज मृत्यू झाला. राजू किसन पाटील (वय ४२, रा. शांतिनगर, पाचगाव) असे त्यांचे नाव आहे. रंकाळा तलावाच्‍या पिछाडीस मंगळवारी त्यांनी विषारी द्रव पिले होते. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू होते. आज त्यांचा मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. त्‍यांच्‍या मागे पत्‍नी, दोन मुलगे असा परिवार आहे. नुकतीच कळंबा येथे राहत्या घराच्या मागील बाजूस एका रिक्षाचालकाने आत्महत्या केली होती.
--------
शिवाजी पेठेत तरुणावर हल्ला

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील सरनाईक वाड्याजवळ काल मध्यरात्री एका तरुणावर हल्ला झाला. यामध्ये भारत मनोहर तोडकर (वय ३८, रा. रायगड कॉलनी, पाचगाव रोड) हे जखमी झाले. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार झाले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
पोलिसांनी सांगितले की, तोडकर यांच्या भाच्याचे शिवाजी पेठेत यात्री निवास आहे. त्यासाठी ते रात्री तेथे गेले होते. यावेळी त्यांच्या डोक्यात पाठीमागून येऊन कोणीतरी लोखंडी काही तरी मारले. यामुळे त्यांना चक्कर आली. त्यानंतर त्यांनी सीपीआरमध्ये जाऊन उपचार घेतले. ते प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यातून हा प्रकार झाला आहे काय, यासह एका संशयिताचेही वर्णन त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार पोलिस अधिक तपास करीत आहेत. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com