मांगले येथील वसंत  कुंभार  यांना “आमदार डॉ. विनय कोरे गौरव प्रतिष्ठान" वारणानगर यांच्या वतीने दिला जाणारा “डॉ. विनय कोरे शिक्षण भूषण पुरस्कार” जाहीर

मांगले येथील वसंत कुंभार यांना “आमदार डॉ. विनय कोरे गौरव प्रतिष्ठान" वारणानगर यांच्या वतीने दिला जाणारा “डॉ. विनय कोरे शिक्षण भूषण पुरस्कार” जाहीर

वसंत कुंभार
02271

वसंत कुंभार यांना
‘शिक्षण भूषण’ जाहीर
मांगले, ता. २२ : येथील वसंत शंकर कुंभार यांना वारणानगरच्या आमदार डॉ. विनय कोरे गौरव प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘डॉ. विनय कोरे शिक्षण भूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. रोख रक्कम ११ हजार १११ रुपये व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण शनिवारी (ता. २५) सायंकाळी पाच वाजता सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते व वारणा समुहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. श्री. कुंभार कांदे (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोनमध्ये वरिष्ठ मुख्याध्यापक आहेत. त्यांनी लादेवाडी, नाटोली येथे विविध उपक्रम राबवून तेथील शाळा नावारूपाला आणल्या. जनगणना कामातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना सन्मानपत्र, रौप्यपदक देवून गौरविले आहे. ते, सामाजिक उपक्रमातही अग्रेसर असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com