आर्थिक विवंचनेतून प्राध्यापकाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर्थिक विवंचनेतून
प्राध्यापकाची आत्महत्या
आर्थिक विवंचनेतून प्राध्यापकाची आत्महत्या

आर्थिक विवंचनेतून प्राध्यापकाची आत्महत्या

sakal_logo
By

84698

आर्थिक विवंचनेतून
प्राध्यापकाची आत्महत्या
राजाराम तलावात मृतदेह; मूळचे आटपाडीचे
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.२२ ः अपेक्षित पैसे कमवू शकलो नाही, आर्थिक विवंचनेतून मी आत्महत्या करीत आहे, अशी चिठ्ठी लिहून शिवाजी विद्यापीठातील कंत्राटी सहायक प्राध्यापकाने राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी आज दिली. डॉ. शैलेश रमाकांत वाघमारे (वय ३८, रा. केदारनगर, मोरेवाडी, मूळ रा. आटपाडी, जि. सांगली) असे त्यांचे नाव आहे. त्यांचा मृतदेह राजाराम तलावात रात्री उशिरा मिळाला. राजारामपुरी पोलिस ठाण्यामध्ये याची नोंद झाली.
पोलिसांनी सांगितले, की विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजी विभागात सहायक प्राध्यापक म्हणून डॉ. वाघमारे नोकरी करीत होते. आटपाडी येथील डॉ. वाघमारे गेल्या १२ वर्षांपासून मायक्रोबायोलॉजी विभागात सहायक प्राध्यापकपदी कार्यरत होते. पत्नीची मणक्याची शस्त्रक्रिया असल्याने त्यांनी २३ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान रजेवर असल्याचे विभागाला कळविले होते. ते मंगळवारी रात्री पावणेआठपर्यंत विभागात होते. त्यांनी आटपाडीला येणार असल्याचे कुटुंबीयांना सांगितले; मात्र रात्री साडेनऊ वाजले तरी ते घरी आले नव्हते. त्यामुळे त्यांचे वडील, भाऊ यांनी मोबाईलवर संपर्क साधला; पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी शोधाशोध सुरू केली.
दरम्यान, एका विद्यार्थ्याला राजाराम तलाव परिसरात त्यांची दुचाकी दिसून आली. त्यांनी याची माहिती विभागाला दिली. डॉ. वाघमारे यांचे कुटुंबीय आणि विभागातील प्राध्यापकांनी याबाबत राजारामपुरी पोलिसांना कळविले. पोलिसांनी तपास केला असता त्यांचा तलाव परिसरात मृतदेह आढळला. पंचनामा करताना पोलिसांना आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करीत असण्याची त्यांच्या हस्ताक्षरांमधील चिठ्ठी मिळाली.

मनमिळावू, शांत स्वभाव
डॉ. वाघमारे यांनी शिवाजी विद्यापीठातून मायक्रोबायोलॉजी विषयातून पीएच.डी.ची पदवी घेतली होती. त्यानंतर ते याच विभागात सहायक प्राध्यापकपदी रुजू झाले. ते मनमिळावू आणि शांत स्वभावाचे होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे.

प्रा. वाघमारे बेपत्ता असल्याचे समजताच विद्यापीठातील त्यांच्या मित्रांनीही शोधाशोध सुरू केली.
रात्री उशिरा राजाराम तलावाजवळ एका विद्यार्थ्याला प्रा. वाघमारे यांची दुचाकी दिसली. त्यानंतर विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी शोध घेतला असता, त्यांचा मृतदेह आढळला.