
शिवसेना शहरप्रमुखपदी भाऊसाहेब आवळे
84723
शिवसेना शहरप्रमुखपदी भाऊसाहेब आवळे
इचलकरंजी ः शिवसेना शहरप्रमुखपदी पालिकेचे माजी बांधकाम सभापती भाऊसाहेब आवळे यांची निवड केली. जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी त्यांना निवडीचे पत्र प्रदान केले. माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, रवींद्र लोहार, महेश ठोके, महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली चव्हाण, पद्मजा इंगवले, सुजाता पाटील, बाजीराव कुंभार आदी उपस्थित होते.
--------------
इचलकरंजीत आज रक्तदान शिबिर
इचलकरंजी ः माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या (ता. २४) सकाळी आठ वाजता रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. भाग्यरेखा चित्रमंदिरसमोरील महापालिका कमर्शियल कॉम्प्लेक्स येथे हा उपक्रम होणार आहे. शिबिरात रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वाढदिवस गौरव समितीने केले आहे. याशिवाय २६ फेब्रुवारीला खासदार चषक क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते व माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. योग जिम्नॅशियम मैदानात हा कार्यक्रम होणार आहे.