Thur, March 30, 2023

‘सुपर अभिनव’तर्फे टॅलेंट हंट परीक्षा
‘सुपर अभिनव’तर्फे टॅलेंट हंट परीक्षा
Published on : 23 February 2023, 12:17 pm
‘सुपर अभिनव’तर्फे टॅलेंट हंट परीक्षा
गडहिंग्लज : येथील सुपर अभिनव सायन्स ॲकॅडमीतर्फे टॅलेंट हंट परीक्षेचे आयोजन केले आहे. रविवारी (ता. २६) सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत ही परीक्षा होईल. गडहिंग्लजसह आजरा, चंदगड, भुदरगड तालुक्यांतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना हक्काचे शैक्षणिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे. सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे ही परीक्षा होणार आहे. सुपर अभिनवमध्ये आयआयटी-मेडिकल फाउंडेशन प्रवेशासाठी ही परीक्षा आवश्यक आहे. परीक्षेत पहिल्या दहा क्रमांकांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.