नवनाथ मंडळ "लोकनाथ चषक"चा मानकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवनाथ मंडळ "लोकनाथ चषक"चा मानकरी
नवनाथ मंडळ "लोकनाथ चषक"चा मानकरी

नवनाथ मंडळ "लोकनाथ चषक"चा मानकरी

sakal_logo
By

84829
कोल्हापूर : नवनाथ मित्र मंडळ संघाला लोकनाथ चषक प्रदान करताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, ऋतुराज क्षीरसागर व अन्य.

‘लोकनाथ चषक’चा
‘नवनाथ’ मानकरी
कोल्हापूर, ता. २३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कसबा बावडा विभागातर्फे आयोजित ‘लोकनाथ चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात थरारक विजय मिळवत नवनाथ मित्र मंडळ प्रणीत झेंडा चौकाने विजेतेपदावर मोहर उमटवली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते विजेत्या-उपविजेत्या संघाला गौरवण्यात आले.
शिवसेना पक्षातर्फे कसबा बावडा विभागातर्फे ‘लोकनाथ चषक’ जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा झाल्या. अंतिम सामना नवनाथ मित्र मंडळ प्रणीत झेंडा चौक विरुद्ध कै. सिद्धार्थ लोट प्रणीत गोळीबार मैदान यांच्यामध्ये प्रकाशझोतात रंगला. या सामन्यात झेंडा चौक संघाने प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत चषक पटकावला. या वेळी उत्तर शहरप्रमुख रणजित जाधव, उदय भोसले, किशोर घाटगे, शहर समन्वयक सुनील जाधव, अंकुश निपाणीकर, उपशहरप्रमुख रोहन उलपे, विराज खाडे, सूरज सुतार, उत्तम रंगापुरे, कृष्णा लोंढे, आदर्श जाधव, राकेश चव्हाण, सचिन पाटील, अभिजित केंबळे उपस्थित होते.