आजरा तालुका संघासाठी मतदार यादी प्रसिद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा तालुका संघासाठी मतदार यादी प्रसिद्ध
आजरा तालुका संघासाठी मतदार यादी प्रसिद्ध

आजरा तालुका संघासाठी मतदार यादी प्रसिद्ध

sakal_logo
By

आजरा तालुका संघासाठी मतदार यादी प्रसिद्ध
२ मार्चपर्यंत हरकती, दाव्यांसाठी मुदत; एप्रिल महिन्यात निवडणुकीची शक्यता
आजरा, ता. २३ ः आजरा तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणूक २०२३ ते २०२८ साठी प्रारुप (कच्ची) मतदार यादी सहकार विभागाने प्रसिद्ध केली आहे. यादीवर २ मार्चपर्यंत हरकती व दावे करता येणार आहेत.
आजरा तालुका संघाची १९६२ मध्ये स्थापन झाली आहे. शेतकऱ्यांची शिखर संस्था म्हणून याची ओळख आहे. तालुका संघाच्या संचालक मंडळाची मुदत जुलै २०२० मध्ये संपली होती. मात्र कोरोना व अन्य कारणामुळे निवडणूक पुढे ढकलली. महिनाभरापूर्वी अ वर्ग विकास सेवा संस्था व ब वर्ग इतर सेवा संस्था गटाचे ठराव घेतले होते. यामध्ये ९७ पैकी ९६ सेवा संस्थाचे ठराव प्राप्त झाले आहेत. बोलकेवाडीच्या ब्रम्हदेव सेवा संस्थेचा ठराव आलेला नाही. या गटातून ७ जागा निवडल्या जाणार आहेत. इतर संस्था गटातील ११३ पैकी ११२ संस्थाचे ठराव प्राप्त झाले आहेत. या गटातून एक संचालक निवडायचा आहे. क वर्ग व्यक्ती सभासद गटातील १० हजार ६२७ मतदारांची यादी प्रसिध्द केली आहे. यामधून ६ संचालक निवडले जाणार आहेत. तसेच महिला २, अनुसुचीत जाती, इतर मागास, भटक्या विमुक्त जाती यातून प्रत्येकी एक असे राखीव गटातील ५ संचालक निवडले जाणार आहेत. प्रारुप मतदार यादीवर २ मार्चपर्यंत हरकती व दावे दाखल करता येणार आहेत. त्याचा निर्णय १३ मार्चला उपनिबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर घेणार आहेत. त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यावर निवडणूक होणार आहे. त्यामुळे एप्रिल महीन्यात तालुका संघाची निवडणूक होण्याची शक्यता आहे.
-----------
आजरा कारखान्याची मे मध्ये निवडणूक
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर यांनी कारखान्यांच्या कार्यकारी संचालकाची बैठक केली. यामध्ये त्यांनी निवडणुकीच्या तयारीबाबत माहिती घेतली. आजरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे पुढील महिन्यात कारखान्याच्या मतदार यादीचा कार्यक्रम लागणार आहे. हा कार्यक्रम लागल्यास कारखान्याची मे मध्ये निवडणूक लागण्याची शक्यता आहे.