प्रबोधनासह हवी कारवाईची गरज (दुधाला भेसळीची चिंता भाग ३ )

प्रबोधनासह हवी कारवाईची गरज (दुधाला भेसळीची चिंता भाग ३ )

मालिका लोगो-
दुधाला भेसळीची चिंता- भाग ३ (टुडे १ वरून)
----

कठोर कारवाईने बसेल भेसळीला लगाम
---
प्रबोधनाची चळवळ व्हावी बळकट; भेसळ करणाऱ्यांची यादी नियमित प्रसिद्ध करावी
सदानंद पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २४ : दुधाची भेसळ ही कधी आकारमान वाढविण्यासाठी, तर कधी टिकवण क्षमता वाढविण्यासाठी केली जाते. काही वेळा दुधातील फॅट वाढविण्यासाठीही रसायनांचा तसेच वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो. गाय, म्हशीच्या गोठ्यापासून संघापर्यंत आणि वितरकांपासून प्रक्रिया करणाऱ्या उत्‍पादकांपर्यंत कोणत्याही टप्‍प्यावर ही भेसळ होऊ शकते. त्यामुळेच मिशन मोडवर याबाबत प्रबोधन करणे व भेसळ करणाऱ्यांवर जुजबी कारवाई न करता त्यांना शिक्षा केली तरच काही प्रमाणात सकारात्‍मक बदल होईल, असे सांगण्यात येते.
दुधाची भेसळ हा विषय सर्वांसाठीच चिंतेचा बनला आहे. देशाला रोज ६५ कोटी दुधाची आवश्‍यकता असून, प्रत्यक्षात १५ कोटी लिटर दुधाचे उत्पादन होते. त्याचाच फायदा काही घटकांनी घेतला आहे. अधिकाधिक नफा कमावण्याच्या उद्देशाने दुधासह त्याच्या उपपदार्थांत भेसळ करण्यावर त्यांचे लक्ष आहे. दुधाची पावडरही भेसळीतून सुटलेली नाही. युरियापासून भेंडी पावडर, साबूदाण्याची पावडर केली जाते. गोडेतेलात विविध केमिकलचा वापर केला जातो. कृत्रिम दूध शरीराला हानिकारक आहे. तरीही भेसळयुक्त दुधाचा पुरवठा केला जातो.
जिल्‍ह्याचा विचार करता दुधातील भेसळीपेक्षा दुधापासून तयार होणाऱ्या उपपदार्थांत भेसळ असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. यात खवा, पेढे, बासुंदी, पनीर यातील भेसळ लक्षणीय आहे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेसळयुक्‍त दुग्‍धजन्य पदार्थ विकल्याच्या तक्रारी अन्न औषध प्रशासन विभागाकडे सातत्याने होत आहेत. ज्या दुधात व दुग्‍धजन्य पदार्थांत रसायनांचा वापर करून भेसळ केली जाते, त्याचा माणसाच्या आरोग्यावरही दुष्‍परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, भेसळीत सहभागी होणाऱ्यांना केवळ दंड आकारून चालणार नाही, अशी ग्राहकांची भावना आहे. दूध व दुग्धजन्य उपपदार्थांत भेसळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी, ही त्यांची मागणी आहे.
(समाप्त)

चौकट
दुधात भेसळ कशासाठी?
- सिद्धांत विरहित म्हणजेच ‘एसएनएफ’चे प्रमाण वाढविणे
- नॉन प्रोटीन नायट्रोजन्स घटकांचे प्रमाण वाढविणे
- अधिक फेस आणून ते ताजेतवाने असेल असे भासविणे
- दुधाची वाढलेली आम्लता झाकणे किंवा लपविणे
- भेसळ केलेले वनस्पतीजन्य फॅट एकजीव करण्यासाठी
.......
चौकट
काय व्हायला हवे?
- दंडात्‍मक कारवाई न करता शिक्षा करावी
- दूध व दुग्‍धजन्य पदार्थ तपासणी प्रयोगशाळा स्थापन करावी

कोट
सर्वसाधारण दुधात पाणी, साखर, मैदा, युरिया, मालटोडिक्सट्रिन, धुण्याचा सोडा, शाम्पू, वनस्पती तूप, सोया दूध, हायड्रोजन पेरॉक्साइड, फॉरम्यालिनसह अन्य काहीही दुधात सहज मिसळू शकते. त्याचे मानवी आरोग्यावर वेगवेगळे दुष्परिणाम होऊ शकतात. भेसळीमुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल गुंतागुंत, कमजोरी, हृदय समस्या, कर्करोग किंवा मृत्यू यांसारख्या गंभीर समस्या उद्‌भवू शकतात.
- डॉ. ज्ञानेश्‍‍वर पतंगे, छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com