आता शिक्षकांचा बहिष्कार, बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी थांबणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता शिक्षकांचा बहिष्कार, बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी थांबणार
आता शिक्षकांचा बहिष्कार, बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी थांबणार

आता शिक्षकांचा बहिष्कार, बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी थांबणार

sakal_logo
By

84885

बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी थांबणार
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे बहिष्कार आंदोलन; नियामकांचे शिक्षण मंडळाला निवेदन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावी परीक्षेतील उत्तरपत्रिका मूल्यमापनावर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन सुरू केले. इंग्रजी विषयाच्या नियामकांनी त्याबाबतचे निवेदन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाला आज दिले. त्यामुळे उत्तरपत्रिकांची तपासणी थांबणार आहे.
कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाने आज इंग्रजी विषयाच्या नियामकांची संयुक्त सभा आयोजित केली होती. या सभेवर त्यांनी बहिष्कार टाकला. महासंघाने पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होत असल्याचे निवेदन नियामक आणि जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण मंडळाचे सहसचिव चव्हाण, अधीक्षक सुभाष दुधगांवकर यांना दिले. मागण्यांच्या पूर्ततेबाबत शासनाकडून सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे जिल्हा संघाचे अध्यक्ष प्रा. अभिजित दुर्गी यांनी सांगितले. विभागातील इंग्रजी विषयाचे मुख्य नियामक प्रा. एन. बी. बुराण, नियामक प्रा. पी. एन. कांबळे, रमाकांत साठे, अनिल पाटील, स्वाती महाडिक, मनोज काळे उपस्थित होते.

मागण्या अशा-
-आश्‍वासित प्रगती योजना त्वरित लागू करावी
-निवडश्रेणीची २० टक्क्यांची अट रद्द करावी
-वाढीव पदांना रूजू दिनांकापासून मंजुरी द्यावी
-आय. टी. विषय अनुदानित करावा
-शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरावीत
-कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी पटसंख्येचे निकष शाळा संहितेनुसार असावेत