आजरा जनता बॅंक निवडणूक बिनविरोध

आजरा जनता बॅंक निवडणूक बिनविरोध

फोटो देत आहे
-----------------
आजरा जनता बॅंक निवडणूक बिनविरोध
इतिहासात प्रथम ः नऊ नव्या चेहऱ्यांना संधी; २२ जणांची माघार
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २३ ः येथील जनता बॅंकेची स्थापना होऊन साठ वर्षे झाली; पण केव्हाही निवडणूक बिनविरोध झाली नाही. यंदा २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक निवडणूक लागली होती. आज माघारीच्या अखेरच्या दिवशी ३७ अर्ज शिल्लक होते. त्यापैकी २२ जणांनी माघार घेतली. १५ जागांसाठी १५ अर्ज शिल्लक राहिल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. नव्या संचालक मंडळात ९ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
जनता बॅंकेची १९६३ मध्ये स्थापना झाली. यंदाची निवडणूक बिनविरोध झाली. ४४ अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर ३७ अर्ज शिल्लक राहिले. आज माघारीच्या अखेरच्या दिवशी १५ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. बॅंकेच्या प्रगतीचा आलेख व कारभार उतम पद्धतीने सुरू असल्याने बॅंकेच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी, असा सभासदांचा सूर होता. त्याला यश आले आहे.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, ज्येष्ठ नेते श्रीपतराव देसाई, अशोक चराटी, जनार्दन टोपले, सुधीर देसाई, उदयराव पवार, संभाजी पाटील, अल्बर्ट डिसोझा, तानाजी देसाई, भीमराव देसाई, संभाजी इंजल, अंकुश पाटील, गुरू गोवेकर, सुभाष नलवडे, सुरेश कालेकर, सुरेश पाटील यांचे सहकार्य लाभले.
------------------
बिनविरोध उमेदवार
सर्वसाधारण - उदयसिंह ऊर्फ मुकुंदराव देसाई, जयवंत गुंडोपंत शिंपी, रणजित नारायण देसाई, जयवंत गणपतराव कोडक, बाबाजी भाऊ नाईक, शशिकांत सूर्याजी नार्वेकर, अमित रमेश सामंत, महादेव केशव टोपले, शिवाजी धोंडिबा पाटील, विक्रमसिंह मुकुंदराव देसाई. महिला राखीव - रेखा सुरेश देसाई, नंदा निवृत्ती केसरकर. अनुसूचित जाती जमाती - महेश दिनकर कांबळे. विमुक्त जाती भटक्या जमाती अथवा विशेष मागास प्रवर्ग - पांडुरंग शंकर तोरगले. इतर मागास प्रतिनिधी - संतोष मारुती पाटील.
------------
पिता- पुत्रांची जोडी
संचालक मंडळामध्ये विद्यमान अध्यक्ष मुकुंदराव देसाई व त्यांचे सुपुत्र विक्रमसिंह देसाई या दोघांना संधी मिळाली आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व बॅंकेचे माजी अध्यक्ष बळीराम देसाई यांच्या तिसऱ्या पिढीचा बॅंकेमध्ये प्रवेश झाला आहे.
-------------
शिंपींची भूमिका महत्त्वाची
विद्यमान संचालक जयवंतराव शिंपी यांनी बॅंकेचे हित लक्षात घेता निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महत्त्वाची भूमिका घेतली. त्यांनी निवडणूक बिनविरोधासाठी समर्थकांचे मन वळवले. त्यांना माघारीसाठी प्रेरित करून निवडणूक बिनविरोध केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com