मुश्रीफ विरूध सोमय्या

मुश्रीफ विरूध सोमय्या

रिझर्व्ह बँक, नाबार्डच्या धोरणानुसारच
दीर्घमुदतीचा निर्णय : हसन मुश्रीफ

कोल्हापूर, ता. २३ : मी आणि माझ्या कुटुंबीयांनी व्यक्तिगत कर्ज घेतलेले नाही. संताजी घोरपडे कारखान्याला घेतलेल्या ३२३ कोटींच्या कर्जाला योग्य ते तारण दिले आहे. यामध्ये साखर तारणाचे कर्जही वेगळे आहे. दरम्यान, कोरोना काळात आत्मनिर्भय योजनेंतर्गत रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या धोरणानुसारच सर्वच साखर कारखान्यांनी घेतलेले अल्पमुदतीचे कर्ज दीर्घ मुदत करण्याचा निर्णय घेतला होता, हा निर्णय सर्वच साखर कारखान्यांना लागू होता. त्यामुळे सोमय्या यांनी अल्प मुदतीचे कर्ज दीर्घमुदतीचे केल्याचा आरोप खोटा आणि चुकीचा असल्याचा प्रत्यारोप आमदार हसन मुश्रीफ यांनी आज केला.
माजी खासदार किरीट सोमय्या, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केलेल्या आरोपानंतर आमदार मुश्रीफ आणि जिल्हा बँकेच्या संचालकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आमदार मुश्रीफ काय म्हणाले?
-सर्व संचालकांनी आपआपल्या कारखान्यांना बँकेतूनच कर्ज घ्यावे आणि व्यवसाय वाढवावा, असा निर्णय झाल्यामुळे जिल्हा बँकेतून संताजी घोरपडे कारखान्याला कर्ज घेतले
-अध्यक्ष आणि सर्व संचालक एकसंघपणे निर्णय घेतात. सर्व संचालकांना विश्‍वासत घेऊनच सर्व निर्णय घेतले जातात. अनेक पक्षांचे संचालक आहेत आणि संचालकांनी घेतलेला निर्णयच ते मान्य करतात. वैयक्तिक निर्णय घेत नाहीत.
-शेतकऱ्यांच्या ठेवीवर पैसे कर्ज काढले म्हणून सोमय्या यांनी सांगितले आहे. मात्र, एका जरी शेतकऱ्यांने मुश्रीफ यांनी माझी फसवणूक केली म्हणून सांगितले तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार
-जिल्हा बँकेकडून घेतलेले एकही कर्ज एनपीएमध्ये नाही. कोणीही आणि कशीही तपासणी करू देत. त्यांना काहीही सापडणार नाही
--
चौकट
विकलेल्या शाहू संघावर १५ कोटींचे अनुदान
कोल्हापूर, ता. २३ : भाजपचे ग्रामीण उपाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी स्वभांडवलावर चालवायला पाहिजे होता असा शाहू सहकारी साखर कारखान्यावर २२५ कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. पंजाब-सिंध संघाला शाहू दूध संघ विक्री केला असतानाही केंद्र सरकारच्या आरकेव्हीवाय या योजनेतून १५ कोटींचे अनुदान मिळवले आहे. तर कागल कॉ-ऑप बँकेमध्ये तर गोंधळ सुरू असल्याचा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. याची सर्व माहिती लवकरच समोर येईल, असेही श्री. मुश्रीफ यांनी नमूद केले. कोल्हापूर जिल्हा बँकेत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिल्हा बँकेवर ईडीचा छापा पडल्यानंतर मी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मी व माझ्या कुटुंबाने बँकेतून एकाही पैशाचे कर्ज घेतलेले नाही. साखर कारखान्यासाठी जे कर्ज घेतले आहे, ते बेकायदेशीर नसून कायदेशीर असल्याचे सांगितले होते. यासंदर्भात मुश्रीफ यांनी काढलेली प्रेस नोटही पत्रकारांना दाखवून याचा खुलासा केला. तर, चुकीचा अर्थ काढूनच हे समरजितसिंह घाटगे यांनी हे कटकारस्थान रचले आहे. ते आज उघड झाले असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com