समरजितसिंह घाटगे विरूध मुश्रीफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समरजितसिंह घाटगे विरूध मुश्रीफ
समरजितसिंह घाटगे विरूध मुश्रीफ

समरजितसिंह घाटगे विरूध मुश्रीफ

sakal_logo
By

घोरपडे कारखान्यासाठी २३१
कोटींचे कर्जःसमरजितसिंह घाटगे

कोल्हापूर, ता. २३ : जिल्हा बँकेतून संताजी घोरपडे कारखान्यासाठी कर्ज घेतले नसल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले होते. मात्र, नाबार्डच्या ऑडिटनूसार २०१८-१९ मध्ये १५८ कोटी ७० लाख आणि २०२१-२२ मध्ये २३२ कोटी ७९ लाखांचे कर्ज घेतले आहे. कर्ज थकीत नसले तरी अध्यक्ष खोट बोलून कर्ज मिळवल्याने जिल्हा बँकेची बदनामी होत नाही का? असा सवाल करत मुश्रीफ यांनी कारखान्याचे नाव बदलून हसन मुश्रीफ प्रायव्हेट लिमिटेड करावे असा सल्ला भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिला.

घाटगे काय म्हणाले?
-आमदार मुश्रीफ म्हणजे जिल्हा बँक नव्हे
-जिल्हा बँकेमुळे मुश्रीफ आहेत हे विसरू नये
-संताजी घोरपडे हा सहकारी नाही तर पूर्ण एका कुटूंबाची कंपनी
-जे कर्ज आहे. ते सर्व यांच्या कुटुंबीयांनाच दिले आहे
-संताजी घोरपडे ही प्रायव्हेट कंपनी असताना जिल्हा बँकेतून यांनी कर्ज कसे काय घेतले? याचं उत्तर द्यावे.
-नाबार्डच्या आडून हा फायदा घेतला आहे. त्यामुळे मुश्रीफ यांनी आपण खोटे बोललो म्हणून मान्य करावे

‘गैरव्यवाहराबद्दल उघडपणे बोलावे’
मी उघडपणे चॅलेंज स्वीकारतो आणि उघडपणेच आव्हान देतो. आजही त्यांनी केलेल्या गैरव्यवाहराबद्दल जाहीर आणि उघडपणे बोलावे. शेतकऱ्यांची बँक म्हणून लोकांची दिशाभूल केली जात आहे. मुश्रीफांचा गैरव्यवहार समोर येवू नये यासाठी भावनिक केले जात असल्याची टिकाही घाटगे यांनी केली.