इचल : अतिक्रमण हातोडा

इचल : अतिक्रमण हातोडा

ich234.jpg 84901
इचलकरंजी ः महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने व्यावसायिकांनी गटारीवर केलेले अतिक्रमण आज हटविले.

दुकानदारांच्या अतिक्रमणावर
इचलकरंजी येथे कारवाई

इचलकरंजी, ता. २३ ः व्यावसायिकांनी दुकानासमोर केलेल्या गटारीवरील अतिक्रमणावर आज महापालिकेचा हातोडा पडला. वर्दळीचा भाग असलेल्या शॉपिंग सेंटरसह मलाबादे चौक ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावर ही धडक कारवाई केली. याशिवाय वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले दोन डिजिटल फलकांसह दुकानांचे स्टॅन्ड बोर्ड आज जप्त केले.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज शॉपिंग सेंटर परिसरात कारवाईला सुरुवात केली. अनेक व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोर गटारीवर अतिक्रमण केल्याचे समोर आले होते. त्यावर आज पथकाने प्रहार केला. परिसरातील दुकानदारांनी धास्ती घेत दुकानांबाहेरील वस्तू आतमध्ये ठेवल्या. कारवाईवेळी गर्दी झाली होती.
याशिवाय मुख्य मार्गावरही अनेक दुकानदारांनी गटारींवर मोठ्या फरशा घातल्या होत्या. त्यामुळे गटारींचे अस्तित्वच दिसत नव्हते. असे अतिक्रमण काढून गटारी खुल्या केल्या. राधाकृष्ण चित्रमंदिर चौक आणि रिंग रोडवरील षटकोन चौक परिसरातून वाढदिवसानिमित लावण्यात आलेले दोन मोठे डिजिटल फलक जप्त केले. सुभाष आवळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com