
प्राधिकरणाला बळ द्या ः भाजपची मागणी
८४८९५
प्राधिकरणातून विकास कामे करा
-
भाजपचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
कोल्हापूर, ता. २३ ः हद्दवाढीला पर्याय म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधिकरणाची निर्मिती केली. मात्र, सध्या प्राधिकरणाकडे मुष्यबळ अपुरे आहे. प्राधिकरणाला आर्थिक आणि मनुष्यबळ देऊन ग्रामिण भागाचा विकास करावा, अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
हद्दवाढीला ग्रामिण जनतेचा विरोध आहे. हे लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्राधिकरणाची स्थापना केली. मात्र सध्या या प्राधिकरणाकडे पुरेसे मनुष्यबळ, पुरेसा निधी नाही. त्यामुळे ग्रामिण भागातील नागरिकांच्या बांधकाम परवानग्या रखडल्या आहेत. यासाठी प्राधिकरणाला तात्काळ आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. प्राधिकरण सक्षम करून ग्रामिण भागातील लोकांचे प्रश्न सोडवावेत. शिष्टमंडळात ज्येष्ठ नेते बाबा देसाई, बाबुराव पाटील, शिवाजी बुवा, संभाजी देसाई, कृष्णात कांबळे, साताप्पा लोहार, एकनाथ पाटील, अमित कांबळे यांचा समावेश होता.