
सोमय्या विरुद मुश्रीफ
जिल्हा बँक सक्षम, मुश्रीफांची
हकालपट्टी करा ः सोमय्या
कोल्हापूर, ता. २३ : चौकशी जिल्हा बँकेची नव्हे तर आमदार हसन मुश्रीफ यांनी केलेल्या गैरव्यवहाराची आहे. त्यामुळे शेतकरी, ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये. मुश्रीफ यांनी अध्यक्षपदाचा गैरवापर करत आपल्याच कंपन्यांना ५५९ कोटी बेकायदेशीररीत्या कर्ज घेतले आहे. तसेच, स्वत:च्या कारखान्याचे अल्पमुदतीचे कर्ज दीर्घ मुदतीचे करून गैरव्यवहार केल्यामुळे मुश्रीफ यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. शासकीय विश्रामगृहात आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, उपाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी महापौर सुनील कदम, सत्यजित कदम, भगवान काटे उपस्थित होते.
सोमय्या काय म्हणाले,
-रिझर्व्ह बँक, नाबार्डच्या तपासणीत हा गैरव्यवहार का आला नाही, याचीही चौकशी होईल
-आयकर, ईडी, कंपनी मंत्रालय चौकशी करत आहेत. सहकार मंत्रालयही यावर नजर ठेवून आहे
-बँकेने एकूण कर्ज, ॲडव्हॉन्स किती आहेत, याची सर्वाधिक वीस जणांची यादी तयार करून घोषित करावी
-यामध्ये मुश्रीफांच्या कंपन्यांना पाच हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज, ॲडव्हॉन्स दिली असावी. यामध्ये केवळ सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याला ५५९ कोटी रुपये दिले आहे
- मुश्रीफ यांच्या परिवातील अनेक कंपन्यांना चुकीच्या पद्धतीने कर्ज दिले आहे
- रुपयांचाही गैरव्यवहार केला नाही म्हणणाऱ्या मुश्रीफांनी माझ्या विरुद्ध कारवाई करावी. मात्र, मी दिलेल्या माहिती बरोबर असेल तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.
चौकट
ईडीकडे सेटेलमेंटसाठी का गेले?
आयकर विभागाच्या अहवालनुसार १५८ कोटी सेल कंपन्यांद्वारे पाठवले आहे. कोट्यवधी रुपयांचा कर चुकवल्याबद्दल मुश्रीफ आयकर सोबत सेटेलमेंट करायला का गेले होते? असा सवालही सोमय्या यांनी केला.