Mon, June 5, 2023

विद्यापीठ परीक्षेत ‘कॉपी’ करणारे चारजण सापडले
विद्यापीठ परीक्षेत ‘कॉपी’ करणारे चारजण सापडले
Published on : 23 February 2023, 5:53 am
‘कॉपी’ करणारे चारजण सापडले
कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठात विविध बारा अभ्यासक्रमांच्या परीक्षा झाल्या. त्यात कॉपी (गैरप्रकार) करताना चार विद्यार्थी विद्यापीठाच्या भरारी पथकांना आज सापडले. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तीन आणि सांगली जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. एमबी. ए., बी. जे. सी. अशा विविध १२ अभ्यासक्रमांची एकूण १४४ विद्यार्थ्यांनी आज परीक्षा दिली. बी. एस्सी., एम. एस्सी., नॅनो सायन्स, एम. ए. हिंदी आदी एकूण १९ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले. कॉपी करताना सापडलेल्या विद्यार्थ्यांवर परीक्षा प्रमाद समितीकडून नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.