Mon, June 5, 2023

संत निरंकारी मिशन अभियान
संत निरंकारी मिशन अभियान
Published on : 23 February 2023, 4:47 am
97036
‘संत निरंकारी’तर्फे
‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियान
कोल्हापूरः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त संत निरंकारी मिशनतर्फे सद्गुरू माता सुदीक्षाजी यांच्या सान्निध्यात रविवारी (ता.२६) ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ अभियान होणार आहे. पाणी जतन व संवर्धनासाठी आवश्यक विविध उपक्रम अभियानातून होणार असून, जलाशयांची स्वच्छता, जनजागृतीवर भर दिला जाणार आहे. देशातील सातशे तीसहून अधिक शहरातील एक हजाराहून अधिक ठिकाणी हा उपक्रम होणार असून, त्यामध्ये मिशनचे दीड लाखांवर स्वयंसेवक काम करणार आहेत. कोल्हापूर विभागात गांधीनगर, कोल्हापूर शहर, खुपिरे, साळवाडी, असळज-गगनबावडा, हुपरी-रेंदाळ, पट्टणकोडोली, वारणानगर, इचलकरंजी, जयसिंगपूर, सिध्दनेर्ली, गारगोटी, थड्याचीवाडी, आजरा, गडहिंग्लज, वाघराळी, नागनवाडी, कोलिक आदी ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे.