
खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेत दुरंगी लढत
खासगी प्राथमिक शिक्षक
पतसंस्थेत दुरंगी लढत
फुलेवाडी, ता. २४ : कोल्हापूर महापालिका खासगी प्राथमिक शिक्षक, सेवक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुरशीची दुरंगी लढत होत आहे. रविवारी (ता.२६) रोजी मतदान व सायंकाळी मतमोजणी होणार आहे.
पतसंस्थेचे संस्थापक व खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शाहू समता पॅनेलविरोधात संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष आनंदा हिरुगडे, राजेंद्र कोरे व संतोष आयरे या तिघांच्या नेतृत्वाखालील राजश्री शाहू परिवर्तन पॅनेल यांच्यात सामना होत आहे.
एकूण १५ जागांसाठी एका अपक्ष उमेदवारासह ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. रसाळे यांच्या समता पॅनेलमध्ये तीन विद्यमान संचालकांसह नवोदित चेहऱ्यांना, महिलांना संधी दिली आहे.
विरोधी राजश्री शाहू परिवर्तन पॅनेलमध्ये तीन विद्यमान संचालक, तसेच तिघेही पॅनेलप्रमुख निवडणूक रिंगणात आहेत. आनंदा हिरुगडे हे पतसंस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष आहेत. त्यांनी आता रसाळे यांची साथ सोडून विरोधात पॅनेल उभे केले आहे. शिक्षक सेनेचे राज्य समन्वयक संतोष आयरे यांना पाच जागा, तर खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांना तीन जागा विरोधी पॅनेलमध्ये दिल्या आहेत.