
आमचं शहर आमचं बजेट
लोगो- आमचं बजेट आमचं शहर
------
फोटो- 84699
.........
मनपाच्या सोळा सेवा एका ॲपवर द्या
-
डिजिटलायझेशनचा केवळ गाजावाजा नको; सेवांचे थर्ड पार्टी ऑडिट झाले पाहिजे
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : महापालिकेने डिजिटलायझेशनचा केवळ गाजावाजा करून चालणार नाही. महापालिकेची वेबसाईट वीस वर्षांपूर्वीची आहे. ती अपडेट कधी होणार? ॲपवर सोळा प्रकारच्या सेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी जनतेची कामे वेळेत करायची असतील तर ते कोठे जातात, हेही कळायला हवे. त्यासाठी त्यांच्या हाताला बँड बांधून ते दिवसभरात काय करतात, याची माहिती उपलब्ध व्हायला हवी. फिडबॅकची सिस्टीम आकाराला येणे गरजेचे आहे. डिजिटलायझेशनच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवांचे थर्ड पार्टी ऑडिट झाले तरच त्या सेवांना अर्थ उरणार आहे. टेक्निकल मनुष्यबळाची भरती करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशा सूचना ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘आमचं शहर आमचं बजेट’ उपक्रमात माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील जाणकार व अभ्यासू घटकांनी मांडल्या.
कचरा उठावासाठीच्या घंटागाड्यांना जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम असणे आवश्यक आहे. शहरात ज्या ठिकाणी कचरा झाला आहे, त्याची माहिती प्रशासनाला मेसेजवर तत्काळ देऊन सेवा देणे महत्त्वाचे ठरणार आहे. ही सिस्टीम केली होती. त्याचे पुढे काय झाले, याचे उत्तर गुलदस्त्यात आहे. जन्म दाखला, बांधकाम परवाने ऑनलाईन मिळणे जरूरीचे आहे. एखाद्या फाईलचा सात दिवसांत कोणकोणत्या टेबलवर प्रवास झाला, हे कळायला हवे. त्याचबरोबर महापालिकेच्या सुविधा ऑनलाईन कोणत्या आहेत, याबाबत जनजागृती होत नाही तोपर्यंत त्याचा लाभ नागरिकांना उठवता येणार नाही. ‘गुगल पे’वर पाणी बिल भरण्याची सुविधा आहे. त्याची अनेकांना माहिती नाही.
वीज, पाणी व घरफाळ्याच्या कामात नाव बदलासाठी एखाद्या व्यक्तीला बाराशे रुपये खर्च येतो. एजंटाच्या माध्यमातून हा खर्च तीन हजारांवर होतो. याला नेमके जबाबदार कोण? व्हॉटसॲप क्रमांकावर तक्रार करण्याची सुविधा दिली पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली.
----------------------
* सूचना अशा-
- ॲन्युएल मेंटेनन्स प्रोग्रॅम गांभीर्याने घेणे आवश्यक
- प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवण्यासाठी सेन्सर बसवा
- शाळांत आरटीई किती जागा रिक्त याची माहिती वेबसाईटवर द्या
- महापालिका शाळांचे डिजिटलायझेशन करा
- पार्किंग व स्वच्छतागृहे नेमकी कोठे याची माहिती ॲपद्वारे द्या
- वेबसाईट आकर्षक करा
............................
* प्रा. डॉ. दिलीप देसाई (मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, केआयटी) : स्वच्छता तपासणीसाठी मोबाईल ॲप बनवा
* राजसिंह शेळके (माजी नगरसेवक) : डिजिटलायझेशनच्या माध्यमातून पाणी गळती शोधून काढा
* संकल्प मेहता (सॉफ्टवेअर डेव्हलपर) : तज्ज्ञांकडून सेवा घेताना किमतीत घासाघिस नको
* अभिजित रेडेकर (प्रभारी संचालक, संगणक केंद्र, शिवाजी विद्यापीठ) : डिजिटलायझेशन सक्षमपणे चालवण्यासाठी टेक्निकल माणसे घ्या
* अजिंक्य सावंत (नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर) : जीपीएस सिस्टिम बसविल्यानंतर त्याचे व्हेरिफिकेशन, ऑडिट करा
* प्रा. प्रमोद पाटील (इंग्लिश ॲॅंड कम्युनिकेशन स्किल, केआयटी) : नो पार्किंगच्या जागेत पार्किंग झालेल्या गाड्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवा
* अभिजित कोळी (सॉफ्टवेअर डेव्हलपर) : घंटागाडीला जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम बसवा
* राहुल जगताप (विभागप्रमुख, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती) : एखाद्या एजन्सीला पाच वर्षांसाठी डिजिटलायझेशनसाठी नियुक्त करा