‘रोहयो’च्या हजेरीतून ग्रामसेवकांची सुटका

‘रोहयो’च्या हजेरीतून ग्रामसेवकांची सुटका

‘रोहयो’च्या हजेरीतून ग्रामसेवकांची सुटका
---
तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश; गटविकास अधिकारी संघटनेचा विरोध?
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ : कामांचा ताण अधिक आहे तर रोजगार हमी योजनेची व्याप्ती अधिक असल्याने रोजगार हमी योजनेसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी ग्रामसेवक संघटनेची होती. तीन वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. रोजगार हमी योजनेवरील मजुरांची हजेरी घेण्याच्या कामातून ग्रामसेवकांची सुटका करण्यात आली. मात्र, गटविकास अधिकारी संघटनेने या निर्णयाला विरोध दर्शविल्याचे समजते.
शासनामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत विविध कामे केली जातात. त्यासाठी मजुरांची नोंदणी केली जाते. रोजगार हमी योजनेचे काम सुरू असेल तर प्रत्यक्ष कामावर असणाऱ्या मजुरांची उपस्थिती नोंदविण्याचे काम ग्रामरोजगार सेवकांकडे सोपविण्यात आले आहे. त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांवर होती. मात्र, ग्रामसेवकांना विविध कामे करावी लागतात. निवडणूक, कृषी, सामाजिक न्याय विभागासह अन्य कामांचा ताण त्यांच्यावर आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या जबाबदारीतून वगळण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेची मागणी होती. त्यासाठी तीन वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता.
दरम्यान, शासनाने ग्रामसेवक संघटनेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. रोजगार हमी योजनेच्या जबाबदारीतून त्यांना वगळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ग्रामसेवकांची या जबाबदारीतून सुटका झाली आहे. पण, शासनाच्या या निर्णयामुळे गटविकास अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढल्याचे दिसून येते. कारण, ग्रामरोजगार सेवकाने मजुरांची उपस्थिती नोंदविल्यावर पडताळणीचे ग्रामसेवकांचे काम बंद झाले आहे. ग्रामरोजगार सेवकानंतर थेट गटविकास अधिकाऱ्यांचीच जबाबदारी राहील. त्यामुळे गावपातळीवरील कनिष्ठ अधिकारी म्हणून ग्रामसेवकांनाच पडताळणीचे काम द्यावे, अशी मागणी गटविकास अधिकारी संघटनेने केल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com