क्रीडा स्‍पर्धा समारोप

क्रीडा स्‍पर्धा समारोप

जिल्हा परिषद ... लोगो
85002
...

कर्मचाऱ्यां‍नी दररोज एक तास खेळासाठी द्यावा

मुख्य कार्यकारी अधिकारी चव्‍हाण ः वार्षिक क्रीडा स्पर्धेचा समारोप


कोल्‍हापूर, ता. २४ : ‘खेळामध्ये हार-जीत होतच असते. त्यामुळे कोणीही निराश न होता प्रत्येकाने आपल्या आवडीच्या खेळासाठी रोज किमान एक तास देणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन कामकाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते’, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी केले. तसेच, पुढील वर्षी सुटीचे नियोजन पाहून स्‍पर्धांचे आयोजन करण्याची सूचना केली. जिल्‍हा परिषदेच्या क्रीडा स्‍पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

क्रीडा स्‍पर्धेत सांघिक व वैयक्‍तिक स्‍पर्धेत उत्‍कृष्‍ट कामगिरी करणाऱ्या‍ खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेती स्नेहांकिता वरुटे व श्री. चव्हाण यांचे हस्‍ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई उपस्‍थित होत्या. देसाई यांनी, आपल्या दैनंदिन जीवनात मैदानी खेळाचे महत्त्व विशद केले. तसेच क्रीडा स्पर्धेचे महत्त्व पटवून देऊन पुढील वर्षी जास्तीत जास्त अधिकारी-कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. स्नेहांकिता वरुटे यांनी, मैदानी खेळामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील ताणतणाव कसा कमी होतो याची माहिती दिली. तसेच, प्रत्येकाने आपल्या आवडीच्या खेळासाठी रोज किमान एक तास दिल्यास शारीरिक विकास चांगल्या प्रकारे होत असल्याचे सांगितले.

बक्षीस वितरण कार्यक्रमास प्रकल्प संचालक सुषमा देसाई, मुख्य लेखा वित्त अधिकारी व्ही. टी. पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, चंदगडचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, हातकणंगले गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, कागल गटविकास अधिकारी सुशील संसारे आदी उपस्‍थित होते.
...

जनरल चॅम्‍पियनशिपबाबत वाद

जनरल चॅम्‍पियनशिपबाबत वाद निर्माण झाला आहे. मुख्यालयाला ही चॅम्‍पियनशिप देण्यास राधानगरी व भुदरगड पंचायत समितीने आक्षेप घेतल्याने फेरमूल्यांकन करून निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी पाच सदस्यीय समिती स्‍थापन करण्यात आली आहे. समितीच्या निर्णयानंतर या चॅम्‍पियनशिपचे वितरण केले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com