
‘रवळनाथ’च्या गडहिंग्लज शाखेचा वर्धापनदिन उत्साहात
gad246.jpg
85020
गडहिंग्लज : रवळनाथ वर्धापनदिनी प्रा. व्ही. के. मायदेव यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी महेश मजती, डॉ. मनोहर पुजारी, डी. के. मायदेव, सुमेधा पाटील, सुशांत जिजगोंडा, अशोक सुळकुडे आदी उपस्थित होते.
-------------------------------------------------
‘रवळनाथ’च्या गडहिंग्लज
शाखेचा वर्धापनदिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ : श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या गडहिंग्लज शाखेचा २१ वा वर्धापनदिन उत्साहात झाला. कचेरी रोडवरील शाखा कार्यालयात रवळनाथ व काळभैरीच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. व्ही. के. मायदेव यांच्याहस्ते झाले.
प्रा. मायदेव म्हणाले, ‘संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांचे कुशल नेतृत्व व सर्व संचालक, शाखा सल्लागार व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे शाखेने १२५ कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे. सध्या मोबाईल बँकिंग, सी.बी.एस., मायक्रो एटीएमद्वारे डिजीटल सेवा दिली जाते. तसेच आरटीजीएस, एनईएफटी, लॉकर, वीज बीलभरणा सेवेसह पेन्शनधारक व जेष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी नॅशनल अॅटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (नॅच) सेवा, गंभीर आजारी व वयोवृध्द ग्राहकांना घरपोच सेवा सुरु आहे.
संचालिका मीना रिंगणे यांच्यासह संदीप कागवाडे, सुनिलदत्त जाधव यांची भाषणे झाली. दरम्यान, यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक, सभासद, ठेवीदार, कर्जदार व ग्राहकांनी भेट देवून संस्थेच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले. संचालक महेश मजती, डॉ. दत्ता पाटील, डॉ. मनोहर पुजारी, प्रा. एस. एन. देसाई, श्रीमती उमा तोरगल्ली, माजी शाखा सल्लागार प्रा. महावीर मरजे, मल्लिकार्जुन मरीगुद्दी, सौ. सुमेधा पाटील, रशिदा शेख, राजेंद्र पाटील, सुविधा केंद्राचे शाखाधिकारी अशोक सुळकुडे उपस्थित होते. शाखाधिकारी सुशांत जिजगोंडा यांनी स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब मार्तंड यांनी सूत्रसंचालन केले. सीईओ डी. के. मायदेव यांनी आभार मानले.