
तारदाळ गावसभेत विविध विषयांवर चर्चा
ich243.jpg
85081
तारदाळ ः भारत निर्माण योजने संदर्भातील विशेष गावसभेत ग्रामविकास अधिकारी बि. डी. कापसे यांनी चर्चा केली.
----------
तारदाळ गावसभेत
विविध विषयांवर चर्चा
तारदाळ, ता. २४ ः येथील भारत निर्माण नळ पाणी पुरवठा योजनेची विशेष गावसभा बोलवली होती. गावसभेत ग्रामआरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती गठीत करणे, सामाजिक लेखापरीक्षण समिती गठीत करणे, महिला समिती गठीत करणे या विषयांवर चर्चा विनिमय केला. यामध्ये सरपंच, ग्रामसेवक, तारदाळ-खोतवाडी गावचे सदस्य यांनी या योजनेचे कामकाज पाहण्याची ग्रामस्थांनी एकमताने मंजूरी दिली.
ग्रामविकास अधिकारी बी. डी. कापसे यांनी सभेपुढील विषय वाचन केले. ग्रामस्थांना भारत निर्माण योजनेच्या कामकाजाबाबत व येणाऱ्या अडीअडचणींबाबत सविस्तर माहिती दिली. सचिन पोवार यांनी योजनेचे काम करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे कर्मचारी व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. जिल्हा नियोजन कमिटीचे सदस्य प्रसाद खोबरे यांनी नविन समिती गठीत करून तारदाळ, खोतवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी यामध्ये लक्ष घालून योजनेचे काम सुरळीत करण्याचे आवाहन केले.
तारदाळ सरपंच पल्लवी पोवार, उपसरपंच दिपाली कोराणे, खोतवाडी सरपंच विशाल कुंभार, उपसरपंच शिल्पा पोवार, विनोद कोराणे, तारदाळ ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील, चंद्रकांत तांबवे, नितीन खोचरे, अकबर करडी, सूरज कोळी, सूर्यकांत जाधव, रणजित पोवार, गजानन नलगे, सावंत माने, संजय चोपडे विजय चौगुले, सुवर्णा दाते, सुरेश पोवार उपस्थित होते.