आवश्यक- संक्षिप्त

आवश्यक- संक्षिप्त

डॉ. यशवंतराव थोरात
यांच्या पुस्तकांचे आज प्रकाशन
कोल्हापूर ः ‘नाबार्ड''चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांच्या ‘काही वाटा काही वळणं’ आणि ‘नवी वाट नवे क्षितीज'' या पुस्तकांचे प्रकाशन शनिवारी (ता.२५) होणार आहे. राजर्षी शाहू स्मारक भवनात सायंकाळी साडेपाचला हा कार्यक्रम होईल. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, अभिनेता नाना पाटेकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रकाशक अस्मिता कुलकर्णी यांनी केले आहे.
................
गुंतवणूकदार परिषद आजपासून
कोल्हापूर ः येथील कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशनतर्फे शनिवार (ता.२५) पासून गुंतवणूदार परिषदेचे आयोजन केले आहे. सायबर कॉलेजमध्ये दोन दिवस ही परिषद होणार असून, सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत मार्गदर्शन सत्रे होणार आहेत. ‘सेबी’च्या अश्विनी भाटिया, कार्यकारी संचालक जी. पी. गर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन होणार आहे. ‘सेबी’, ‘बीएसई’, ‘बीएसई-आयपीएफ'', ‘एनएसई’, ‘एमसीएक्स'',‘एनएसडीएल'', ‘सीडीएसएल'',‘एसबीआय-म्युच्युअल फंड'', ‘एनआयएसएम'' आदी संस्थांचे पदाधिकारी परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसांची परिषद सर्वांसाठी निःशुल्क असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष विपीन दावडा, उपाध्यक्ष प्रविण ओसवाल, सचिव अजित गुंदेशा यांनी केले आहे.
............
महालक्ष्मी अन्नछत्रातर्फे उद्या महारक्तदान शिबिर
कोल्हापूर ः येथील श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे रविवारी (ता.२६) महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. पाचशे एक रक्त बाट्ल्यांचे संकलन शिबिरातून होणार असून, ताराबाई रोडवरील श्री महालक्ष्मी धर्मशाळेत सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत शिबिर होईल. रक्तदात्यांसाठी लकी ड्रॉ होणार असून, भाग्यवान विजेत्यांना अनुक्रमे मायक्रोवेव्ह ओव्हन, मिक्सर, डबल बर्नर शेगडी, व्हेजीटेबल कटर, इस्त्री अशी बक्षीसे दिली जाणार आहेत. त्याशिवाय सर्व रक्तदात्यांना श्री माहालक्ष्मी हेल्थ चेकअप कार्ड दिली जातील. शिबिराचा सर्वानी लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.
...............
‘मन की बात''चे उद्या सराफ संघात थेट प्रसारण
कोल्हापूर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ‘मन की बात'' उपक्रमातून जनतेशी संवाद साधतात. रविवारी (ता.२६) सराफ व्यापारी संघाच्या सभागृहात या उपक्रमाचे थेट प्रसारण होणार आहे. महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, गुजरी येथील व्यापारी व फेरीवाल्यांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन समिधा प्रतिष्ठानने केले आहे. यावेळी सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड, भाऊसाहेब गणपुले, किरण नकाते, जयंत गोयाणी, अविनाश उरसाल आदींची प्रमुख उपस्थिती असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com