
विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सोमवारी विविध उपक्रम
विद्यापीठात मराठी भाषा गौरव
दिनानिमित्त सोमवारी विविध उपक्रम
कोल्हापूर, ता. २४ः शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागात सोमवारी (दि. २७) मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध उपक्रम होणार आहेत. सकाळी १०.३० वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन केले आहे. या ग्रंथदिंडीमध्ये हुपरी येथील संत बाळूमामा भजनी मंडळाचे वारकरी आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सकाळी ११.३० वाजता वि. स. खांडेकर भाषाभवन सभागृहात डॉ. यशवंतराव थोरात लिखित ‘काही वाटा काही वळणं’ आणि ‘नवी वाट नवे क्षितीज’ या दोन ग्रंथांवर चर्चासत्र होईल. त्यात प्रा. रघुनाथ कडाकणे, प्रा. डॉ. रणधीर शिंदे सहभागी होतील. या कार्यक्रमाला डॉ. थोरात हे प्रमुख उपस्थित, तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के असतील. दुपारी १ वाजता परिवर्तन (जळगाव) निर्मित ‘भिजकी वही’ या कवी अरुण कोलटकर यांच्या कवितांवर नाट्यात्मक सादरीकरण केले जाणार आहे. कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विभागप्रमुख प्रा. नंदकुमार मोरे यांनी केले आहे.