बाजार समिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार समिती
बाजार समिती

बाजार समिती

sakal_logo
By

बाजार समितीकडून सुधारित मतदार
यादी जिल्हा निवडणूक प्राधिकरणाकडे

कोल्हापूर, ता. २४ः जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सुधारित मतदार यादी आज बाजार समितीने जिल्हा निवडणूक प्राधिकरणास सादर केली. यात सेवा संस्था गटात १४ हजार १३१, तर ग्रामपंचायत मतदार गटात ५ हजार ७३३ मतदारांचा समावेश आहे.
जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर होऊन चार महिने होत आले. दोन महिन्यांपूर्वीच बाजार समितीने निवडणूक प्राधिकरणाकडे मतदारांची यादी पाठवली होती. यात जुन्या ग्रामपंचायत सदस्यांचा मतदार म्हणून समावेश होता. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका झाल्या यात नवीन सभासद निवडून आले त्यांच्या नावांचा समावेश नव्हता, त्यामुळे बाजार समिती निवडणुकीत मतदान जुन्या ग्रामपंचायत सदस्यांनी करावे की नवीन ग्रामपंचायत सदस्यांनी करावे, याचा तांत्रिक पेच निर्माण झाला हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयातूनही निवडणुका एप्रिल महिन्यापूर्वी घेण्याचे आदेश दिले.
त्यामुळे मतदार यादी सुधारणा करण्यासाठी वेळ उपलब्ध झाला त्याच आधारे सहकार विभागानेही बाजार समित्यांनी नवीन ग्रामपंचायत सदस्यांची नावे घालून सुधारित मतदार यादी निवडणूक प्राधिकरणाला सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार येथील जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीने सुधारित यादी तयार करून दिली आहे.

सुधारित मतदार यादीमध्ये ग्रामपंचायत सदस्य व विविध सेवा संस्था गटातील मतदारांच्या नावात बदल झाले आहेत, मात्र बाजार समितीसाठी माथाडी कामगार व व्यापारी, अडते प्रतिनिधी यांच्या नावांच्या यादीत सुधारणा झालेली नाही. ज्या व्यापारी, अडते व माथाडींचा मतदानास पात्र ठरण्यासाठीचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशा जवळपास २९२ हून अधिक मतदारांचा या यादीमध्ये समावेश झालेला नाही. याविषयी लवकरच उच्च न्यायालयात दाद मागू ,अशी प्रतिक्रिया बाजार समितीचे माजी संचालक ॲड. किरण पाटील यांनी दिली आहे.