Fri, June 9, 2023

संक्षिप्त
संक्षिप्त
Published on : 25 February 2023, 5:01 am
85173
ऐश्वर्या पोवारचे यश
कोल्हापूर ः मध्यप्रदेश (भोपाळ) येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स् २०२३ स्पर्धेत कदमवाडी येथील ऐश्वर्या मुरलीधर पोवार हिने सुवर्णपदक पटाकवले. तिने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करताना १० मीटर एअर रायफल मिक्स् इव्हेंटमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. तिला मार्गदर्शक संदीप तरटे, युवराज साळोखे, अजित पाटील, सचिन चव्हाण, विनय पाटील यांचे मार्दर्शन मिळाले. तसेच आई-वडीलांचे प्रोत्साहन मिळाले.