पत्रकार निदर्शने

पत्रकार निदर्शने

85299

माराहाणीच्या निषेधार्थ
पत्रकारांची निदर्शने
कोल्हापूर, ता. २५ ः कणेरी मठाच्या गो-शाळेतील गाई दगावल्याच्या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या वृत्रवाहिन्यांच्या पत्रकारांना झालेल्या माराहाणीच्या निषेधार्थ कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने आज पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. माराहाण करणाऱ्या गुंडांना अटक करा, गायींच्या मृत्युची चौकशी करा यासह विविध मागण्यांचे निवेदन प्रेस क्लबच्यावतीने तहसीलदार संतोष कणसे यांना देण्यात आले.
दरम्यान, पत्रकारांना मारहाण करणाऱ्या कोल्हापुरातील कणेरी मठाचे स्वयंसेवक व प्रमुखांचा पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून निषेध करण्यात आला. संबंधितांवर अटकेची कारवाई न झाल्यास श्रमिक पत्रकार संघाकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघाचे अध्यक्ष स्वप्निल बापट यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
कणेरीतील सिध्दगिरी मठाच्या गो-शाळेत १२ हून अधिक गायींचा मृत्यु झाला. या घटनेचे वार्तांकन करत असताना दुरचित्रवाणीच्या पत्रकार व कॅमेरामन यांना माराहाण झाली. या घटनेच्या निषेधार्थ पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शन केली.
प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, कार्याध्यक्ष दिलीप भिसे, सचिव बाबा खाडे यांच्यासह वृत्तपत्र, दुरचित्रवाणीचे प्रतिनिधी, कॅमेरामन मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com