
गडहिंग्लजला भाजप कार्यकर्त्यांची बैठक
85233
गडहिंग्लज : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी भाजपची बैठक झाली. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.
गडहिंग्लजला भाजप कार्यकर्त्यांची बैठक
गडहिंग्लज : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया सोमवारी (ता. २७) गडहिंग्लजमध्ये येत आहेत. कोळकी लॉनमध्ये सायंकाळी पाच वाजता ते तालुक्यातील किसान सन्मान निधी लाभार्थीशी संवाद साधणार आहेत. सिंधीया यांच्या दौऱ्याचे नियोजन आज बैठकीत केले. विस्तारक संदीप नाथबुवा यांनी सिंधीया यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागण्याचे आवाहन केले. भाजपचे तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील यांचे भाषण झाले. शेतकरी संवादाचे नियोजन केले. चंद्रकांत सावंत यांनी आभार मानले. शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, मारुती राक्षे, अनिता चौगुले, निलांबरी भुईंबर, प्रीतम कापसे, संग्राम हसबे, अशोक पांडव, संतोष तेली, रवी घोरपडे, मार्तंड जरळी, संतोष कल्याणी, अनिल खोत, बाजीराव खोत, संजय बटकडली, संदीप पाटील, दत्तात्रय नाईक, बसवराज आरबोळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सिंधीया यांचा दौरा यशस्वी करण्याचा निर्धार बैठकीत झाला.