तांदूळवाडी, वाघुर्गेमधील
दोन बनावट दवाखाने सील

तांदूळवाडी, वाघुर्गेमधील दोन बनावट दवाखाने सील

फोटो येणार....

तांदूळवाडी, वाघुर्डेमधील
दोन बनावट दवाखाने सील
राधानगरी पोलिसांची कारवाई; कंपाउंडरच झाला डॉक्टर

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः राधानगरीतील गर्भलिंग निदान प्रकरणातील बनावट डॉक्टर विठ्ठल निकम याचे तांदूळवाडी आणि वाघुर्डे (ता. पन्हाळा) येथील दोन बनावट दवाखाने राधानगरी पोलिसांनी आज सील केले. यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली. त्याने केलेल्या गर्भपातांचीही माहिती पोलिसांनी घेतली आहे. सध्या निकम कोठडीत आहे. त्याला सोबत घेऊनच पोलिसांकडून आता गर्भलिंग निदानातील अधिक माहिती घेतली जात असल्याचे राधानगरी पोलिसांनी सांगितले.
राधानगरी आणि भुदरगड तालुक्यात बोगस डॉक्टरांकडून गर्भलिंग निदान आणि गर्भपात केला जात होता. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या पुढाकारातून राधानगरी आणि भुदरगड पोलिसांनी याचे स्टिंग ऑपरेशन करून पर्दाफाश केला. त्यामुळे आता याच्यामुळापर्यंत जाण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले आहेत. दोन दिवसांपूर्वी एजंट संजय आप्पासाहेब गोंधळी (रा. सुळकूड, ता. कागल) आणि बनावट डॉक्टर विठ्ठल हिंदूराव निकम (सावर्डे दुमाला, ता. करवीर, सध्या चंबुखडी) याला अटक केली. निकम बारावीपर्यंत शिकल्याचे तपासात स्पष्ट झाले. तो पूर्वी कंपाउंडर होता. निकमने दोन दवाखाने पन्हाळा तालुक्यात सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पन्हाळा तालुक्यातील तांदूळवाडी येथील ‘सद्‌गुरू क्लिनिक’ आणि वाघुर्डे येथील ‘निकम क्लिनिक’ सील केली. निकम तांदूळवाडीत दुपारी चार ते सायंकाळी सहापर्यंत तर वाघुर्डे येथे सायंकाळी सात ते दहापर्यंत थांबून उपचार करीत होता, अशी माहिती पुढे आली आहे. तेथील औषधांचाही साठा जप्त करीत सील ठोकल्याचे राधानगरी पोलिस ठाण्याच्या निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी सांगितले.
कळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. मनोज माने, साहाय्यक मिलिंद गुळवणी, जयवंत भास्कर, पोलिस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे, हेडकॉन्स्टेबल के. डी. लोकरे, सचिन पारखे आणि बी. डी. पाटील, सुरेश मेटिल, कॉन्स्टेबल गजानन गुरव, रोहित खाडे यांचा पथकात समावेश होता.

निकमने यापूर्वी केलेल्या गर्भपातांची माहिती घेतली आहे. संबंधित महिलांचे जबाबही घेतले आहेत. निकमकडून काही रुग्णांना कोल्हापुरातील डॉक्टरांकडेही पाठविले जात होते. त्याचाही तपास आम्ही करणार आहोत.
- स्वाती गायकवाड, पोलिस निरीक्षक, राधानगरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com