द्राक्ष आवक

द्राक्ष आवक

खुल्या बाजारात द्राक्ष तेजीत
बाजार समितीत आवक घट; विक्रीसाठी नवे पर्याय अवलंब
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : यंदा हवामानाची चांगली साथ दिल्याने यंदा द्राक्ष उत्पादनात मोठी वाढ झाली. असे असतना बाजार समितीतील सुविधा अभावामुळे द्राक्षांच्या आवकेत यंदा निम्म्याने घट झाली. खुल्या बाजारात द्राक्षांच्या थेट विक्रीचे प्रमाण दुप्पटीने वाढले आहे. परिणामी घाऊक व किरकोळ बाजारपेठेतही द्राक्ष भाव यंदा तेजीत आहेत. त्यामुळे यंदाचा द्राक्ष हंगाम बागायतदार व ग्राहकांसाठी हिताचा ठरू लागला आहे.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत सांगली, तासगाव, विटा, कवठेमंहकाळ, बार्शी, आष्ठा, वाळवा, इस्लामपूर, सांगोला, मिरज, अथणी, चिक्कोडी, शिरोळ, निपाणी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात द्राक्ष येतात. दरवर्षी याच महिन्यात दोन अडीच टन द्राक्ष येत होती. यंदा मात्र उत्पादन चांगले असूनही घाऊक बाजारपेठेत द्राक्ष कमी येत आहेत. दिवसाला केवळ दिड हजार बॉक्स द्राक्ष जवळपास एक टन आवक होत आहे.
याबाबत शेतकरी रायगोंड चौगुले म्हणाले की, ‘‘ बाजार समितीत द्राक्षे आणली की, सौद्यात भाव पडला किंवा मालाचा उठाव कमी झाल्यास द्राक्षे शिल्लक राहतात. उघड्यावर ठेवल्यास खराब होऊन नुकसान होते. सर्व व्यवहारासाठी एक ते दोन दिवसांनंतर पैसे मिळतात. सौद्यात सलग तिन चार दिवस भाव कमी होतो तर कधी एक दोन दिवसच भाव वाढतो. त्यामुळे क्विचित फायदा तर बहुतांशी वेळा नुकसान सोसावे लागते. त्यामुळे शेतातील द्राक्षे गडी लावून थेट विक्री केली जाते. येथे रोखीने पैसे मिळतात आम्ही मागेल तो भाव मिळतो यातून किमान नुकसान टळते. ज्यांचा माल जास्त मनुष्यबळ कमी अशा बागायतदाराला द्राक्ष बाजार समितीच्या सौद्यात आणावी लागतात. हेही वास्तव आहे.’’
-----------
चौकट
द्राक्षांचे यंदाचे भाव ६० ते १२० रूपये एक किलो
सोनाक्का (लांबट मणी), शरद सिडलेस (काळे मणी), थॉमसण (गोलाकार मणी) या तिन जातीचे द्राक्ष कोल्हापूरातील बाजारपेठेत जास्त प्रमाणात आवक आहे.
------------------
याचाही झाला परिणाम
खासगी आराम बस, एसटी सेवा, खासगी वाहनातून अवघ्या सहा ते दहा तासात द्राक्ष मुंबई पुण्याच्या बाजारपेठेत पोहचतात तेथे भाव १५० रूपयांच्या पुढेच मिळतो. त्यामुळे बहुतांशी बागायतदार द्राक्ष तिकडे पाठवत आहेत. बाजार समितीत येणारा द्राक्ष माल जवळपास एक टन आवक होते. तर खुल्या बाजारपेठेत जवळपास दोन ते अडीच टन माल विक्री होतो अशी यंदाची स्थिती आहे.
---------------
असेही पर्याय वापरात
विविध स्थानीक मॉल प्रदर्शन, कृषी प्रदर्शन, द्राक्ष महोत्सव, थेट मंडईत, रस्त्याकडेला स्टॉल्स लावणे, प्रेझेंट बॉक्समधून द्राक्ष कार्पोरेट कंपन्यांना पाठवणे असे अनेक पर्याय सद्या बागायतदार वापरू लागले आहेत. यातून रोखीने पैसे मिळतात. परिणामी बाजार समितीतमध्ये द्राक्ष येण्याचे प्रमाण घटले. ज्यांच्या द्राक्षांचे बॉक्स दोनशे पेक्षा अधिक आहेत असे शेतकरी अजूनही बाजार समितीत द्राक्ष सौद्यासाठी आणतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com