गडहिंग्लज परिसरतील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरतील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरतील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरतील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

हिरलगेत उद्या दत्त उत्सव सोहळा
गडहिंग्लज : हिरलगे (ता. गडहिंग्लज) येथील चिरका माळावर मंगळवारी (ता. २८) श्री दत्त उत्सव सोहळा आयोजित केला आहे. सकाळी आठ वाजता भजन आणि बुधवारी (ता. १) सकाळी आठला अभिषेक होईल. दहा वाजता दत्तभक्त काणे महाराज यांचे कीर्तन व श्रींचा जन्मसोहळा होणार आहे. दुपारी १२ पासून महाप्रसाद होणार आहे. श्री दत्तभक्त कै. गायकवाड गुरुजी परिवार व भक्त मंडळातर्फे या सोहळ्याचे आयोजन केले आहे.
-------------------
गडहिंग्लजला उद्या विज्ञान दिन सांगता
गडहिंग्लज : येथील मराठी विज्ञान परिषद, गडहिंग्लज नगरपरिषद व कृषी विभागातर्फे मंगळवारी (ता. २८) सायंकाळी साडेचारला राष्ट्रीय विज्ञान दिनाची सांगता कार्यक्रम होणार आहे. या वेळी स्पर्धा पारितोषिक वितरण व कृषी विभागाचे विस्तार व प्रशिक्षण केंद्राचे संचालक विकास पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. मुख्याधिकारी स्वरूप खारगे अध्यक्षस्थानी असतील. भाजी मार्केटच्या पहिल्या मजल्यावर हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहान संयोजकांनी केले आहे.
-------------------
कल्लेश्‍वर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शुभेच्छा
गडहिंग्लज : भडगाव येथील कल्लेश्‍वर हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पोलिसपाटील उदय पुजारी अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक सुरेश मगदूम यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संतोष कुरबेट्टी, रवींद्र शेंडुरे, शंकर चोथे यांनी मार्गदर्शन केले. सर्वांचा सत्कार केला. राजश्री कोले यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा कुंभार यांनी आभार मानले. सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
-------------------
85329
गडहिंग्लज : बॅ. नाथ पै प्रशालेच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात विद्यार्थिनींनी समूहनृत्य सादर केले.

नाथ पै प्रशालेत स्नेहसंमेलन उत्साहात
गडहिंग्लज : येथील बॅ. नाथ पै प्रशालेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. मुख्याधिकारी स्वरूप खारगे अध्यक्षस्थानी होते. डॉ. उत्तमचंद्र इंगवले यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. प्रशासन अधिकारी रमेश कोरवी, महादेव पाटील, विलास जाधव, अनिलकुमार साळोखे, पूजा माने, शुभांगी कावणेकर, अबोली मांडेकर, शोभा गिलबिले, सविता ताशिलदार, आबेदा अत्तार, विजय पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती. सहाशे विद्यार्थ्यांनी संमेलनात भाग घेतला. मधुकर येसणे, नंदकुमार वाईंगडे, बाळासाहेब वालीकर, मधुकर जांभळे, अनिल बागडी, अय्याज बागवान, विष्णू कुराडे, प्रकाश म्हेत्री, अशोक जाधव आदी उपस्थित होते. लेझीम पथकात सहभाग माता-पालकांचा सत्कार झाला. मुख्याध्यापिका सुवर्णा पोवार यांनी स्वागत केले. वैशाली पाटील, अशोक शेरेकर, रावसाहेब आंबूलकर यांनी सूत्रसंचालन केले. विष्णू बेनके यांनी आभार मानले.
-------------------
साई एज्युकेशनमध्ये कार्यशाळा उत्साहात
गडहिंग्लज : गिजवणेतील साई स्पेशल बीएड (एचआय) कॉलेज व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रातर्फे साई एज्युकेशन सोसायटीत विद्यार्थ्यांसाठी अपंग क्षेत्राशी निगडित कायदेविषयक कार्यशाळा झाली. या वेळी संकेश्‍वरच्या महात्मा गांधी लॉ कॉलेजचे प्रा. संजीव ऐकणे यांनी पीडब्ल्यूडी अ‍ॅक्ट या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अपंग क्षेत्रातील कायदेविषयक ज्ञानाची माहिती दिली. केंद्र संयोजक तानाजी गायकवाड, समंत्रक व विद्यार्थी उपस्थित होते.
-----------------
85330
गडहिंग्लज : इतिहास विभागातर्फे प्रमाणपत्र कोर्स उद्‌घाटनप्रसंगी मनोहर कोळसे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण आदी उपस्थित होते.

‘ओंकार’मध्ये पर्यटन प्रमाणपत्र कोर्स प्रारंभ
गडहिंग्लज : येथील ओंकार कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय व राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयातील इतिहास विभागातर्फे ऐतिहासिक पर्यटन, तर इंग्रजी विभागातर्फे बेसिक कोर्स इन इंग्लिश ग्रामर प्रमाणपत्र कोर्सचे उद्‍घाटन डॉ. मनोहर कोळसे व प्र. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांच्या हस्ते झाले. या वेळी कोळसे यांनी स्थानिक इतिहास व पर्यटनातून उपलब्ध होणाऱ्या‍ करिअरच्या संधीविषयी माहिती दिली. या कोर्सअंतर्गत विद्यार्थ्यांना पर्यटनस्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. प्रा. एस. एस. सरमगदूम, प्रा. गजानन कुलकर्णी, सागर सावंत, मेघा बाळेशगोळ, शुभम कांबळे, अरुण कांबळे, प्रिया नंदी, प्रदीप पकाले उपस्थित होते. प्रा. प्रशांत कांबळे यांनी स्वागत केले. अमृता हातकर यांनी सूत्रसंचालन केले. करुणा गिरी यांनी आभार मानले.
---------------
85331
मुत्नाळ : एस. डी. हायस्कूलमध्ये एम. आर. कलकुटगी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विलास शिंदे व इतर उपस्थित होते.

मुत्नाळ प्रशालेत शुभेच्छा समारंभ
गडहिंग्लज : मुत्नाळ येथील एस. डी. हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ झाला. मुख्याध्यापक विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते. एम. आर. कलकुटगी प्रमुख पाहुणे होते. अजित मसाळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रतीक्षा बस्तवाडी, प्राजक्ता गड्ड्यान्नावर, रसिका कल्याणी, गोदावरी चौडाज, गायत्री कंकणवाडी या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. शेखर गवळी यांनी वर्षभर राबवलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. कलकुटगी, शिंदे यांचे भाषण झाले. पार्वती पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कल्पना पाटील यांनी आभार मानले. शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
----------------
गडहिंग्लज प्रशालेत पारितोषिक वितरण
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूलमध्ये दहावी विद्यार्थ्यांना शुभेच्छा व पारितोषिक वितरण कार्यक्रम झाला. गीतांजली साळुंखे प्रमुख पाहुण्या होत्या. डॉ. अंकुर कदम, सुनील पोवार, पोवार, प्राचार्य पंडित पाटील, पर्यवेक्षक सुनील कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कादंबरी राऊत, रोहित इंगवले, अंकिता कांबळे, यश पाटील, चंद्रकांत कुंभार, गीतांजली साळुंखे, अंकुर कदम, सुनील पोवार, पंडित पाटील यांची भाषणे झाली. मोहन कुंभार यांनी प्रास्ताविक केले. वैजनाथ पालेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. संगीता देसाई यांनी सूत्रसंचालन केले. सुरेखा घोरपडे यांनी आभार मानले.
----------------
न्यू इंग्लिशमध्ये विद्यार्थ्यांना शुभेच्छा
दुगूनवाडी : चन्नेकुप्पी (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. पालक बापूसाहेब निकम अध्यक्षस्थानी होते. बी. एम. मगदूम प्रमुख पाहुणे होते. मुख्याध्यापिका रशिदा शेख यांनी स्वागत केले. सी. बी. निकम यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. याप्रसंगी प्रीती जाधव, हर्षद भदरगे, यश पोवार, एस. एम. माने, सानिका निकम, आदित्य चव्हाण, सूरज लोहार यांनी मनोगत व्यक्त केले. सौ. व्ही. व्ही. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आदेश नाईक यांनी आभार मानले.
----------------
बसर्गे हायस्कूलमध्ये कार्यक्रम
दुगूनवाडी : बसर्गे (ता.गडहिंग्लज) येथील एस. एम. हायस्कूलमध्ये दहावी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मुख्याध्यापक आनंदा वाघराळकर यांनी प्रास्ताविक केले. ऐश्‍वर्या मगदूम, दानेश्‍वरी संकेश्‍वरी, स्नेहल नाईक, भक्ती सावेकर, समीक्षा कोणूर, सानिका वालकर यांनी मनोगत व्यक्त केले. एस. बी. पाटील, संस्थेचे सचिव आर. बी. टेळे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत वर्षादेवी नाडगोंडे-सरकार अध्यक्षस्थानी होत्या. सध्याचे युग स्पर्धेचे आहे. याला आपण कसे सामोरे जावे, कसा संघर्ष करावा यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. संचालक कटकोळी, मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते. ढवणे यांनी सूत्रसंचालन केले. एम. एस. जोडगुद्री यांनी आभार मानले.