प्रश्‍नमंजुषा स्पर्धेमध्ये शिंदे, साधना प्रशालेचा संघ प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रश्‍नमंजुषा स्पर्धेमध्ये शिंदे, साधना प्रशालेचा संघ प्रथम
प्रश्‍नमंजुषा स्पर्धेमध्ये शिंदे, साधना प्रशालेचा संघ प्रथम

प्रश्‍नमंजुषा स्पर्धेमध्ये शिंदे, साधना प्रशालेचा संघ प्रथम

sakal_logo
By

85399
गडहिंग्लज : प्रश्‍नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांसोबत डॉ. एस. के. नेर्ले, मंजिरी देशपांडे, माधुरी पाटील, मारियन बारदेस्कर, स्वाती घोटणे आदी.

प्रश्‍नमंजुषा स्पर्धेमध्ये शिंदे,
साधना प्रशालेचा संघ प्रथम
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २६ : येथील मराठी विज्ञान परिषद, गडहिंग्लज पालिका व कृषी विभागातर्फे झालेल्या प्रश्‍नमंजुषा स्पर्धेत मराठी माध्यमातून सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलच्या स्वयंम कुंभार व ओंकार पाटील, तर इंग्रजी माध्यमातील साधना प्रशालेच्या सन्यामी पाटील व सृष्टी पाटगावे यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भडगाव रोडवरील सायन्स सेंटरमध्ये या स्पर्धा झाल्या. स्पर्धेचा निकाल असा : मराठी माध्यम - प्रांजली देसाई व सिद्धीका देसाई (के.आर.एम. हायस्कूल ऐनापूर), शुभम पाटील व सुरज खवरे (आप्पासाहेब गायकवाड हायस्कूल महागोंड), इंग्रजी माध्यम- रिया सावंत व तनया हिडदुग्गी (पार्वती शंकर उत्तूर), प्रथमेश सदलगे व जोशुआ औचिते (सर्वोदय, गडहिंग्लज).
डॉ. एस. के. नेर्ले यांचे स्वागत केले. स्पर्धाप्रमुख मंजिरी देशपांडे यांनी स्पर्धेची माहिती दिली. मराठी माध्यमाच्या स्पर्धा माधुरी पाटील, दिपक सावंत, मारियन बारदेस्कर, अभिलाषा चव्हाण यांनी तर इंग्रजी माध्यमाच्या स्पर्धा मंजिरी देशपांडे, स्वाती घोटणे, बी. डी. पाटील, बी. के. आरबोळे, सोनाली पाटोळे यांनी घेतल्या.