
‘केटकाळे’मध्ये सण वार व्रत वैकल्ये
‘केटकाळे’मध्ये सण वार व्रत वैकल्ये
इचलकरंजी : डॉ. जया आदिनाथ चौगुले प्राथमिक विद्यामंदिर, श्री आदिनाथ केटकाळे बालमंदिर व शिशूगटातर्फे २४ सण वार व्रत वैकल्ये या विषयावर बालप्रदर्शन झाले. याचे उद्घाटन सचिन चौगुले (सिव्हिल इंजिनिअर) यांच्याहस्ते केले. अध्यक्षस्थानी डॉ. पी. जे. बडबडे होते. रिना माळी, मुख्याध्यापिका सौ. हुल्ले, सुवर्णा ऐनापुरे, श्रीमती जोशी, दीपा टाकळे, अनिता शिंदे, उपस्थित होते. स्वागत रवींद्र पाटील, तीर्थंकर माणगावे यांनी केले. सूत्रसंचालन करून आभार तानाजी कांबळे यांनी मानले.
---------------------------
दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा
इचलकरंजी : डी. के. टी. ई. इंग्लिश मेडियम हायस्कूलमध्ये दहावीचा शुभेच्छा समारंभ झाला. नववीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थी अभिनव सावंत याने दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेबाबत शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका भारती कासार, यू. एस. कुंभार, एस. एस. पाटील आदी उपस्थित होते. पाहुण्याचा परिचय अलविरा मुजावर हिने करून दिला.
----------------------------
ich261.jpg
85413
इचलकरंजी ः पर्यावरण बचाव पदयात्रेमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पोदार इंटरनॅशनलची परिवर्तन पदयात्रा
इचलकरंजी : पोदार इंटरनॅशनल प्रशालेची पर्यावरण बचाव पदयात्रा झाली. पोदार एजुकेशनच्या वार्षिक उपक्रमा अंर्तगत पदयात्रेचे आयोजन केले होते. ढोल आणि लेझीमच्या तालावर पर्यावरण बचाव पदयात्रेची सुरुवात शहरच्या मध्यवर्ती भागातून केली. विद्यार्थ्यांनी पृथ्वी वाचवा, पाणी वाचवा, पर्यावरण वाचवा असा संदेश देणारे फलक प्रदर्शित केले. फेरीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे झाली. फेरीच्या शेवटी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या टाकवूपासून टिकावू वस्तूंचा बाजार भरवला. त्यापासून आलेली रक्कम समाज उपयोगी कार्यासाठी वापरली जाणार आहे. पदयात्रेत प्राचार्य ईश्वर पाटील आदी उपस्थित होते.
----------------------
गुरुकुल ॲकॅडमीचे यश
इचलकरंजी : नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे जानेवारी २०२३ मध्ये घेतलेल्या सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेमध्ये गुरुकुल स्कॉलर ॲकॅडमीच्या १३ पैकी ११ विद्यार्थ्यानी यश मिळवले. गुरुकुल स्कॉलर ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सलग तीन वर्षे यश मिळवून हॅट्ट्रिक केली आहे. प्रवेश परीक्षेमध्ये गुरुकुलचे श्रावणी नायकुडे, लावण्या कारदगे, श्रावणी चौगुले, संस्कृती धुमाळे, श्रेयस पाटील, इशांत पोवार, हर्षल हालांडे, आयुष्य पुजारी, अर्णव माळी, श्रीवर्धन बरगाले, आर्यन बेलवळे हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन गणेश नायकुडे, व्हाईस चेअरमन नविता नायकुडे, दादासाहेब कारदगे यांचे मार्गदर्शन लाभले.