डॉक्टर पुरस्कार

डॉक्टर पुरस्कार

85435

बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेस
राष्ट्रीय पातळीवरील आठ पुरस्कार

कोल्हापूर, ता. २६ ः कोल्हापूर ॲकॅडमी ऑफ पेडिआट्रीक्स या बालरोगतज्ञ डॉक्टरांच्या संघटनेनेने गेल्या वर्षभरात केलेल्या कामाची दखल घेऊन राष्ट्रीय पातळीवरील आठ पुरस्काराने गौरवण्यात आले. सोमवारी (ता. २०) रोजी गुजराथ मधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात हे पुरस्कार देण्यात आले.
राष्ट्रीय पातळीवर १५० पर्यंत सभासद असलेल्या शहरांमधून सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून कोल्हापूर शाखेचा गौरव करण्यात आला. वर्षभरात संस्थेने मुलांच्या स्वास्थ्यासाठी घेतलेल्या उपक्रमांमध्ये लहान मुले व पौगंडावस्थेतील मुलांसाठीचे विविध उपक्रम, परिसंवाद, पब्लिक फोरम इत्यादी चे आयोजन करण्यात आले होते. स्तनपान सप्ताह, जलसंजीवनी सप्ताह, जीवन संजीवनी सप्ताह तसेच मंगोल मुलांच्या समस्या व जनजागृती, मुलांतील अँटिबायोटिक्सचा योग्य वापर, निरोगी जीवनशैली, मुलींचा विशेष गौरव, विशेष मुलांच्या समस्या, पौगंडावस्थेतील मुलामुलींना मार्गदर्शन यावरील विविध उपक्रमासाठी हे पुरस्कार देण्यात आले. संघटनेच्या अध्यक्षा डॉ. किमया शहा, सचिव डॉ. शिल्पा हिरुगडे, खजिनदार डॉ. अजय शिंदे यांनी हा पुरस्कार स्विकारला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com