
पंचतारांकित एमआयडीसाठी मोठा उद्योग द्या
85450
.........
पंचतारांकित एमआयडीसाठी मोठा उद्योग द्या
उद्योजकांची मागणी; केंद्रीयमंत्री राणे यांच्याशी चर्चा
कोल्हापूर, ता. २६ ः जिल्ह्यात कागल-हातकणंगले पंचतांराकित औद्योगिक वसाहत मोठी आहे. त्याठिकाणी एकदा मोठा उद्योग द्या, अशी मागणी उद्योजकांनी आज येथे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे केली.
कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री राणे यांची उद्योजकांनी सिद्धगिरीमठ येथील सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवात भेट घेतली. रस्ते, वीज, मनुष्यबळ आदी सुविधांयुक्त पंचतारांकित एमआयडीसी आहे. त्याठिकाणी ॲटोमोबाईल, फौंड्री आदी क्षेत्रांशी संबंधित एकदा मोठा उद्योग देण्याच्यादृष्टीने आपल्या उद्योग विभागाकडून कार्यवाही व्हावी, अशी मागणी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगलेचे (मॅक) अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे यांनी केले. त्यावर याबाबतच्या सविस्तर चर्चेसाठी मुंबई येथे बैठक आयोजित केली जाईल. त्यासाठी आपण सर्वजण या, असे मंत्री राणे यांनी सांगितले. यावेळी ‘मॅक’चे उपाध्यक्ष मोहन कुशिरे, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुरेंद्र जैन उपस्थित होते.