धन्वंतरी सेवक पतसंस्था बेकायदेशी समिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धन्वंतरी सेवक पतसंस्था बेकायदेशी समिती
धन्वंतरी सेवक पतसंस्था बेकायदेशी समिती

धन्वंतरी सेवक पतसंस्था बेकायदेशी समिती

sakal_logo
By

‘धन्वंतरी पतसंस्थेची
सुकाणू समिती नियमबाह्य’

कोल्हापूर, ता. २६ : संचालक मंडळाला मार्गदर्शन करण्यासाठी कोणत्या कमिटीची स्थापना करता येत नाही. त्यामुळे, जिल्हा आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांच्या धन्वंतरी सेवक सहकारी पतसंस्थेतील सुकाणू कमिटीही नियमबाहय आहे. या कमिटीचा संस्थेच्या कामात हस्तेक्षेप होऊ नये, असा निर्णय जिल्हा उपनिबंधकांनी दिला आहे. याबाबत आसिफ पठाण यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार दिली होती. जिल्हा उपनिबंधकांच्या सूचनेनंतर संस्थेला असणारा सुकाणू समितीचा फलक काढला.
पतसंस्थेत जून २०२२ ला संचालकांची पहिली सभा झाली. यामध्ये त्यांनी संचालक मंडळास मार्गदर्शन करण्यासाठी सुकाणू समितीची नियुक्त करण्याचा ठराव केला. वास्तविक सहकारी संस्थांमध्ये सुकाणून समिती करता येत नसतानाही समिती केल्याची तक्रार पठाण यांनी केली होती. त्यानूसार याची चौकशी झाली. जानेवारी २०२३ मध्ये याची तत्कालिन जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्यासमोर सुनावणी झाली. यात तक्रार व सत्ताधाऱ्यांबद्दलची सर्व माहिती घेवून निर्णय दिला.