Wed, March 29, 2023

अनधिकृत बांधकामे नियमितची मागणी
अनधिकृत बांधकामे नियमितची मागणी
Published on : 26 February 2023, 3:38 am
अनधिकृत बांधकामे
नियमितची मागणी
इचलकरंजी ः राज्य शासनाने ज्याप्रमाणे उल्हासनगरमधील अनधिकृत असलेली बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याच धर्तीवर येथील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली. महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामे वाढली आहेत. त्यात बहुतांश मालमत्ता या आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांच्या असल्याने त्यांच्यावर कारवाई करणे अडचणीचे ठरेल. ती नियमित करून द्यावीत, अशी मागणी सातत्याने या मालमत्ताधारकांकडून होत आहे. त्यामुळे आमदार आवाडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी केली. त्याला सकारात्मकता दर्शवत मुख्यमंत्री शिंदे यांनी या संदर्भात प्रस्ताव तातडीने महापालिकेकडून मागवून घेण्यात यावा, असे लेखी आदेश दिले आहेत.