Wed, June 7, 2023

संक्षिप्त बातम्या
संक्षिप्त बातम्या
Published on : 26 February 2023, 1:32 am
85462
...
डॉ. संजय पोवार-वाईकर यांची निवड
कोल्हापूर ः कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे कार्यालयीन सचिव डॉ. संजय पोवार-वाईकर यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ग्राहक संरक्षण सेलच्या उपाध्यक्षपदी निवड केली. तसेच त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र प्रभारीसुद्धा कार्यभार दिला. संजय पोवार-वाईकर यांनी कोल्हापूर जिल्हा ग्राहक संरक्षण सेलचे अध्यक्ष म्हणून केलेली कामगिरी पाहता त्यांची निवड महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षपदी केली. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. निवडीचे पत्र मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेश ग्राहक संरक्षण सेलचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आले.