महावितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरण
महावितरण

महावितरण

sakal_logo
By

प्रस्तावित वीज दरवाढीविरोधात उद्या आंदोलन

विक्रांत पाटील-किणीकर ःसर्वपक्षीय, विविध संघटना, उद्योजक, शेतकरी होणार सहभागी

कोल्हापूर, ता. २८ ः महावितरण कंपनीने मागणी केलेली प्रस्तावित सरासरी ३७ टक्के दरवाढ पूर्णपणे र­द्द करावी, या मागणीसाठी मंगळवारी (ता. २८) ताराबाई पार्कातील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर दुपारी १२ वाजता वीजदरवाढ प्रस्तावाची होळी करण्यात येणार आहे. यात सर्वपक्षीय, विविध संघटना, संस्था, उद्योजक, व्यापारी व घरगुती वीज ग्राहक तसेच सर्व सहकारी पाणीपुरवठा संस्था व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी दिली.
ते म्हणाले, ‘महावितरण कंपनीने विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेमध्ये दोन वर्षांमध्ये ६७ हजार ६४४ कोटी रुपये तुटीच्या भरपाईची मागणी केली आहे. एकूण दोन वर्षांचा हिशेब करता ही मागणी सरासरी ३७ टक्के दरवाढीची आहे. स्थिर व मागणी आकार, वहन आकार व वीज आकार या तिन्ही आकारांत वाढीची मागणी आहे. यातून एकूण वाढ सरासरी २ रुपये ५५ पैसे प्रतियुनिट आहे. ही दरवाढ कृषी, घरगुती, उद्योग व सर्वच घटकांसाठी आहे. ही दरवाढ कोणत्याच ग्राहकांना परवडणारी नाही. महाराष्ट्र राज्यातील कृषिपंपाचे वीजदर हे देशात सर्वाधिक आहेत. राज्यातील सध्याचे कृषिपंपाचे वीजदर कमी करून देशातील अन्य राज्यांच्या तुलनेने स्पर्धात्मक व समपातळीवर आणावेत, अशी मागणी वीज ग्राहक संघटनांनी केली आहे.’
सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या वीजबिलावरील मागील पोकळ थकबाकी अद्याप कमी झालेली नाही. ती कमी करून मार्च २०२३ पर्यंत असलेला सवलतीचा वीजदर पुढे कायम असावा, अशी इरिगेशन फेडरेशनची मागणी आहे.
...

विभागनिहाय जाहीर सुनावण्या घ्याव्यात

वीज दरवाढ प्रस्तावावर वीज नियामक आयोग पूर्वी विभागवार जाहीर सुनावणी घेत होते. तेही यंदा बंद करून ऑनलाईन पद्धतीने हरकतींवर सुनावणी होणार आहे. यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांना कैफियत व आक्षेप सहजपणे मांडणे मुश्कील होणार आहे. किमान येथून पुढे पूर्वीप्रमाणे विभागनिहाय जाहीर सुनावण्या घ्याव्यात, अशी मागी वीज ग्राहक संघटनांकडून करण्यात येत आहे, असेही पाटील-किणीकर यांनी सांगितले.