आरोग्य योजनांचे ग्रामपातळीवर नियोजन

आरोग्य योजनांचे ग्रामपातळीवर नियोजन

ajr261.jpg
85463
आजरा ः येथील जनआरोग्य समिती कार्यशाळेत दाजी दाईंगडे यांनी मार्गदर्शन केले. अविनाश पाटील, डॉ. यशवंत सोनवणे, रवि देसाई, काशिनाथ मोरे आदी उपस्थित होते.
---------------------
आरोग्य योजनांचे ग्रामपातळीवर नियोजन
गटविकास अधिकारी दाजी दाईगंडे; आजऱ्यात जनआरोग्य समिती कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २६ ः आरोग्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. याचा लाभ गरीब, गरजू लाभार्थ्यांना झाला पाहिजे. यासाठी आरोग्य यंत्रणा गतीमान केली जाईल. या योजनांसाठी ग्रामपंचायत पातळीवर नियोजन करणार आहे, असे गट विकास अधिकारी दाजी दाईगंडे यांनी सांगीतले.
येथील पंचायत समितीमध्ये जन आरोग्य समिती कार्यशाळा झाली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तालूका पातळीवर उपकेंद्र समितीच्यावतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे अध्यक्षस्थानी होते. राजश्री शाहू महाराज यांच्या फोटो पुजनाने कार्यशाळेची सुरुवात झाली.
तालूका आरोग्य अधिकारी डॉ. सोनवणे यांनी जनआरोग्य समिती रचना, अबंधित निधीचा विनियोग याबाबत माहिती दिली. सहाय्यक गट विकास अधिकारी अविनाश पाटील, सरपंच जे. एम. पाटील, मनिषा देसाई, कृष्णा कुंभार, नर्सिंग ऑफिसर सुमन मोहिते यांच्यासह जनआरोग्य समिती पदाधिकारी, आशा वर्कस, एएनएम, एमपीडब्लू उपकेंद्र डॉक्टर, तालुक्यातींल संरपंच उपस्थित होते. संवाद संस्थेचे राज्य समन्वयक रवि देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यांनी आयुष्यमान भारत मिशन, कम्युनिटी ॲक्शन फॉर हेल्थ (सीएएच) या योजनांची कार्य, संकल्पना आणि जबाबदारी याची माहिती दिली. जन आरोग्य समिती सक्षमीकरण व पुर्नबांधणी करून आरोग्य यंत्रणांना बळकट करण्याची गरज असल्याचे सांगीतले. जनआरोग्य समिती कार्यकर्ते संजय घाटगे यांनी आभार मानले.
-----------
जन आरोग्य समिती बळकटीकरण करण्यासाठी व गाव पातळीवर दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी उपकेंद्र समिती व्हीएचएनएस समिती व ग्रामपंचायत यांच्यात समन्वय असावा. गावातील प्रत्येक घटकाला आरोग्याच्या हमीच्या, हक्काच्या सेवा मिळण्यासाठी गावपातळीवर महिला ग्राम सभा, आरोग्य ग्राम सभा, बाल सभा तसेच वार्ड सभा घेण्याचे नियोजन करावे.
-काशिनाथ मोरे, तालुका समन्वयक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com