शाहू मिल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहू मिल
शाहू मिल

शाहू मिल

sakal_logo
By

रखडलेल्या प्रकल्पांना यंदा तरी निधी मिळणार का?

इंट्रो - शहर आणि जिल्ह्यातील विविध प्रकल्प राज्य शासनाकडून निधी न मिळाल्याने रखडले आहेत. दरवेळी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होते, पण कोल्हापूरकरांच्या पदरी निराशाच येते. यंदाच्या अर्थसंकल्पात तरी या रखडलेल्या प्रकल्पांना, योजनांना निधी मिळणार का?
...

शाहू मिलमध्ये स्मारकाची प्रतीक्षाच

लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांनी सुरू केलेल्या शाहू मिलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्याबरोबरच टेक्स्टाईल पार्क उभारण्याची घोषणा हवेतच आहे. शाहू कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने या मिलची स्वच्छता झाली, त्यावेळी सत्तेत असलेल्या आणि आताच्या सताधाऱ्यांनी याठिकाणी बरेच काही करण्याची घोषणा केली, पण कृतज्ञता पर्वाचे वर्ष संपत आले तरी यावर कारवाई झालेली नाही. कृतज्ञता पर्वानंतर या मिलला घातलेले कुलूप तसेच आहे, या परिसराची पुन्हा एकदा दुरवस्था होण्याची भीती आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी त्यासाठी ठोस निर्णय होणार का?
......................................

पंचगंगा प्रदूषणमुक्ती आराखड्याचे काय?
पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी काही कोटींचा आराखडा बनवण्यात आला. यामध्ये इचलकरंजीमध्ये एस.टी.पी प्रकल्प उभे करणे, नदी काठच्या गावांना एस.टी.पी प्रकल्प देणे, याशिवाय अन्य उपाययोजना होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत बैठकही घेतली, पण पुढे काहीच झाले नाही. राज्यातील सरकार बदलले त्यालाही आता सहा महिने झाले, पण अजून पंचगंगा प्रदूषणमुक्ती आराखड्याला निधी मिळालेला नाही किंवा त्याच्या अंमलबजावणीबाबत ठोस निर्णय नाही. या आराखड्याला निधीची तरतूद होणार कधी?
------------------------------

८० कोटींपैकी केवळ आठच कोटी
अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी २०१९ मध्ये राज्य सरकारने ८० कोटींचा निधी मंजूर केला. त्यात बिंदू चौक, व्हीनस कॉर्नर येथील भक्त निवास, मंदिर परिसरातील दर्शन मंडप, बिंदू चौक, सरस्वती टॉकीज, व्हीनस कॉर्नर येथे बहुमजली पार्किंगचा समावेश होत आहे. त्यातील केवळ ८ कोटी २० लाख निधी येऊन सरस्वती टॉकिजजवळील पार्किंगचे काम सुरू आहे. इतर कामांपैकी एका कामाचा तरी निधी उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा आहे.
-------------------------------------
रस्त्यांसाठीचे १०० कोटी केव्हा?
पाऊस व दोन वर्षांतील पुरामुळे शहरातील रस्ते प्रचंड खराब झाले आहेत. महत्त्वाचे व वर्दळीचे १६ रस्ते करण्यासाठी महापालिकेने १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. तसेच तातडीचा विशेष निधी देण्याचीही घोषणा झाली, पण आजतागायत केवळ कागदावरच आहे. महापालिकेकडे निधी नसल्याने पॅचवर्क करण्यापलीकडे काही झालेले नाही.
--------------------------------
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय
कोल्हापुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी शासकीय तंत्रनिकेतन परिसरातील जागेची निश्‍चिती झाली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव शासन नियुक्ती समितीकडून गेल्या सहा महिन्यांपूर्वी उच्च शिक्षण विभागाला सादर झाला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जूनपासून या महाविद्यालयाची सुरुवात होईल, असे सांगितले होते. मात्र, त्याबाबतची पुढील काही कार्यवाही शासनाकडून अद्याप झालेली दिसत नाही.
----------------------------

विद्यापीठाचा सुवर्णमहोत्सवी निधी रखडला

शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारने ४५ कोटींचा निधी सन २०१८ मध्ये मंजूर केला होता. मात्र, आतापर्यंत या निधीपैकी सुमारे ७ कोटी रुपये विद्यापीठाला शासनाकडून मिळाले आहेत. उर्वरित निधी मिळाला नसल्याने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठाने निश्‍चित केलेले उपक्रम रखडले आहेत.