
महसूल स्पर्धा
कोल्हापूर महसुलच ‘चॅम्पियन’
पुणे विभागीय महसूल क्रीडा स्पर्धा; सोलापूरला उपविजेतेपद
कोल्हापूर, ता. २६ : पुणे विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत व्यैयक्तिक मैदानी खेळाचे प्रकार, सांघिक, इनडोअर खेळ, वैयक्तिक खेळामध्ये कोल्हापूर महसूल विभागाने ३६६ पदके मिळवत सर्वसाधारण विजेतपद तर, सोलापूरने १७५ पदके मिळवत उपविजेते पटकावले. पोलिस कवायत मैदान येथे ही स्पर्धा झाली. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
पुणे विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातील महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक, सोलापूरचा द्वितीय आणि सातारा जिल्ह्याचा तिसरा क्रमांक पटकावला. सांगली जिल्हा व्दितीय व सातारा जिल्हा यांचा तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत 50 विविध खेळामध्ये सुमारे 750 स्पर्धेकांनी सहभाग घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, पुणे अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, सारथी पुणेचे अप्पर जिल्हाधिकारी अशोक पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, गौरव नाटेकर, शरद पाटील आदी उपस्थित होते.
चौकट
स्पर्धेत जिल्हा निहाय मिळालेले पदके
खेळाचा प्रकार* खेळाचे प्रकार* कोल्हापूर* पुणे* सांगली* सातारा*सोलापूर
अॅथलेटिक्स*२६*६७*२५*५२*४१*४९
सांघिक*१२*१६४*२८*३२*६८*६८
इंनडोअर*२६*८१*५५*१३*३२*५३
मैदानी खेळ*४*८*१२*०*१३*३
जलतरण*६*२६*१९*४*३*२
संचलन*२*२०*०*१२*४*०
एकूण* ७५*३६६*१३९*११३*१६१*१७५