खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेत सत्ताधारी ठरले भारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेत सत्ताधारी ठरले भारी
खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेत सत्ताधारी ठरले भारी

खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेत सत्ताधारी ठरले भारी

sakal_logo
By

85513
.......

खासगी प्राथमिक शिक्षक
पतसंस्थेत सत्ताधारी ठरले भारी
---
भरत रसाळेंच्या नेतृत्वाखाली सलग ३० व्या वर्षी सत्ता; तीन जागांवर ‘परिवर्तन’
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ ः कोल्हापूर महापालिका खासगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सन २०२३-२८ या कालावधीतील पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गट (छत्रपती शाहू समता पॅनेल) १५ पैकी १२ जागांवर विजय मिळवत भारी ठरला. सुमारे ३६० कोटींची उलाढाल असलेल्या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखाली सलग ३० व्या वर्षी सत्ताधारी गटाने बाजी मारली. विरोधातील राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेलला तीन जागांवर यश मिळविता आले.
येथील आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूलमध्ये आज सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत पतसंस्थेसाठी मतदान झाले. एकूण ४२४ सभासद मतदारांनी ४२० सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यातील आठ मते अवैध ठरली. सायंकाळी पाचला मतमोजणी सुरू झाली. साडेसातला निकाल जाहीर झाला. त्यात ‘समता पॅनेल’चे शिवाजी भोसले (मते २५२), कृष्णात चौगुले (२१९), शिवाजी सोनळकर (२२०), सर्जेराव नाईक (२२२), साताप्पा कासार (२४९), माधुरी घाटगे (२१५), मच्छिंद्र नाळे (२४८), सूर्यकांत बरगे (२२३- सर्वसाधारण प्रवर्ग), अमित परीट (२४१, ओबीसी प्रवर्ग), वर्षाराणी वायदंडे (२३०), रोहिणी हेडगे (२३२, महिला प्रतिनिधी) विजयी झाले. ‘परिवर्तन पॅनेल’च्या राजेंद्र कोरे (२३२, एस. सी. प्रवर्ग), संतोष आयरे (२५५, एन. टी. प्रवर्ग), राजेश कोंडेकर (२२६, सर्वसाधारण प्रवर्ग) यांनी यश मिळविले. दरम्यान, निकालानंतर ‘समता पॅनेल’च्या उमेदवार, समर्थकांनी गुलालाची उधळण, विजयाच्या घोषणा देत विजयी रॅली काढत जल्लोष केला.
...

आमच्या पॅनेलवर सभासदांनी विश्‍वास ठेवून सलग ३० व्या वर्षी आम्हाला पाठबळ दिले. त्याबद्दल संस्थाप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक आणि कार्यकर्ते, सभासद यांना धन्यवाद देतो. जाहीरनाम्यांमध्ये दिलेली आश्‍वासने पुढील काळात पूर्ण केली जातील.
- भरत रसाळे, प्रमुख, छत्रपती शाहू समता पॅनेल
................

गेल्या निवडणुकीत आमचा निसटता पराभव झाला. मात्र, या निवडणुकीत सभासदांनी चांगल्या मताधिक्याने आमच्या तीन उमेदवारांना निवडून दिले. त्याबद्दल सभासदांचे आभार मानतो.
- राजेंद्र कोरे, प्रमुख, राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेल