रजपूते यांच्या वाढदिनी विविध उपक्रम

रजपूते यांच्या वाढदिनी विविध उपक्रम

ich271.jpg
85540
इचलकरंजी ः माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्या वाढदिवसानिमित्त समाधान वृध्दाश्रमातील जेष्ठांना जीवनावशक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
------
रजपूते यांच्या वाढदिनी विविध उपक्रम
इचलकरंजी, ता. २७ ः येथील माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांचा वाढदिवस विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून झाला. रक्तदान शिबीर, वृध्दाश्रमातील जेष्ठांना जीवनावशक वस्तूंचे वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, किल्ला स्पर्धेतल्या विजेत्यांना बक्षिस वितरण, अंगणवाडीतील बालकांना खाऊचे वाटप असे विविध कार्यक्रम झाले. दरम्यान, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रजपूते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनीही अवयव दान करण्याची घोषणा केली. ४५१ जणांनी रक्तदान केले. प्रभाग १२ मधील अंगणवाड्यांतील मुलांना खाऊचे वाटप तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com