चिंचेवाडी विद्या मंदिरचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव

चिंचेवाडी विद्या मंदिरचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव

85585
चिंचेवाडी : शाळेच्या शतकोत्सव सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात आमदार राजेश पाटील यांचा सत्कार सर्जेराव कदम यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रकाश चव्हाण, अमर चव्हाण, शरद मगर, तानाजी कांबळे आदी.

चिंचेवाडी विद्या मंदिरचा
शतकोत्तर सुवर्णमहोत्सव
विविध कार्यक्रम उत्साहात; वाद्यांच्या गजरात मिरवणूक
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २७ : चिंचेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव सोहळा उत्साहात झाला. यानिमित्त विविध कार्यक्रमांसह झांज व इतर वाद्यांच्या गजरात गावातून विद्यार्थ्यांची फेरी निघाली. आमदार राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सरपंच राजश्री घेवडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्यानंतर वाद्यांच्या गजरात ग्रंथदिंडी व कलश मिरवणुकीला सुरुवात झाली. यात आजी-माजी विद्यार्थी, महिला व ग्रामस्थांचा सहभाग होता. आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम झाला. पाटील यांच्या हस्ते शाळेला देणगी मिळालेल्या विविध वस्तूंचे उद्‍घाटन झाले. अंगणवाडी सेविका, आशा सेविकांनी स्वागतगीत सादर केले. आजी-माजी शिक्षक, आजी-माजी सैनिक, गुणवंत विद्यार्थी, माजी सरपंच, उद्योजकांचा सत्कार आमदार पाटील यांच्या हस्ते झाला. राजेश पाटील, प्रा. पी. डी. पाटील, बबन भिमुगडे, अमर चव्हाण, प्रकाश चव्हाण यांची भाषणे झाली. मुख्याध्यापक तानाजी कांबळे यांनी प्रास्ताविकात शाळेच्या कार्याचा आढावा घेतला. उपसरपंच सर्जेराव कदम यांनी स्वागत केले. चंद्रकांत कोरे यांनी आभार मानले.
यावेळी गटविकास अधिकारी शरद मगर, सरपंच घेवडे, अनिकेत कोणकेरी, शेलार, चिंचेवाडी ग्रामविकास मंडळ, मुंबईचे अध्यक्ष शिवाजी कणुकले, मारुती चौगुले, स्वप्नील कोरे, अशोक नाईक, ग्रामसेवक संजय पुकळे, शामराव भिमुगडे, श्री. आजगेकर, सुरेश घेवडे, मधुकर येसणे, अंगणवाडी सेविका शीला पुजारी, रावण, चंदाराणी कांबळे, परीट, शुभांगी नाईक, सुषमा नाईक, शीला कांबळे, रुपाली परीट आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com