मराठी राजभाषा दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी राजभाषा दिन
मराठी राजभाषा दिन

मराठी राजभाषा दिन

sakal_logo
By

साधनामध्ये मराठी
राजभाषा दिन उत्साहात
गडहिंग्लज, ता. २७ : येथील साधना प्रशालेत मराठी राजभाषा दिन व कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्राचार्य जी. एस. शिंदे अध्यक्षस्थानी होते. या वेळी विद्यार्थ्यांनी पसायदान, श्‍लोक, अभंग, पोवाड्याचे सादरीकरण करून मराठी काव्यांच्या विविध अंगांचे दर्शन घडविले. तृप्ती राजमाने हिने मराठी दिनाचे महत्त्व सांगितले. एस. एम. घोडके यांनी पिंगळ्याबद्दल माहिती देऊन लोककला जागृत ठेवण्याचे आवाहन केले. संचालक अरविंद बारदेस्कर यांनी मराठी दिनाविषयीची माहिती दिली. पर्यवेक्षक आर. एन. पटेल, श्री. शिंदे यांचीही भाषणे झाली. बी. एन. वाघमारे यांनी स्वागत केले. शायानखान पठाण, सूरज नेवडे, साक्षी मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले. शीतल हरळीकर यांनी आभार मानले. शीतल भवारी यांनी नियोजन केले. अर्जुन पावले, संभाजी कुंभार, रमण लोहार, राहुल डिसोझा, किरण सोनटक्के, प्रवीण गोडसे यांचे सहकार्य मिळाले. राकेश हिरेमठ, विनय नाईक आदी उपस्थित होते.
--------------------
85586
गडहिंग्लज : मराठी राजभाषादिनी भित्तीपत्रक स्पर्धा उद्‌घाटनप्रसंगी विजयकुमार चौगुले, रवींद्र लोखंडे, संपत सावंत उपस्थित होते.

जागृतीमध्ये भित्तीपत्रिका स्पर्धा उत्साहात
गडहिंग्लज : येथील जागृती प्रशालेत मराठी राजभाषा दिनानिमित्त भित्तीपत्रिका स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत ८० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. पाचवी ते सातवी गटात चार्वी कुंभार, आर्या पाटील, अनुष्का मिरजे, आठवी ते नववी गटात गायत्री पाटील, गौरी पाटील, स्वराली देसाई, संचित काळे, संस्कृती कुरळे यांनी यश मिळविले. प्राचार्य विजयकुमार चौगुले, रवींद्र लोखंडे यांची भाषणे झाली. सृष्टी सुतार हिने मनोगत व्यक्त केले. संपत सावंत यांनी स्वागत केले. स्पर्धेचे परीक्षण अमित हिरेमठ, प्रकाश गायकवाड, राजेंद्र पाटील यांनी केले. शिवाजी अनावरे, प्रकाश हरकारे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. मनोहर भोई यांनी सूत्रसंचालन केले. गीता पाटील यांनी आभार मानले.