मठाच्या सहवासातून शांतीचा मार्ग; निजगुणी देवरू

मठाच्या सहवासातून शांतीचा मार्ग; निजगुणी देवरू

85588
तनवडी : कमलेश्‍वर मठातर्फे महादासोहचा प्रारंभ भगवानगिरी महाराजांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. या वेळी उदयकुमार देसाई, अ‍ॅड. संजय देसाई, बसवराज आरबोळे, आप्पासाहेब देसाई आदी उपस्थित होते.

मठाच्या सहवासातून शांतीचा मार्ग
---
निजगुणी देवरू; तनवडीत महादासोह सोहळ्यास प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २७ : समाजाची वाटचाल शांततेच्या दिशेने सुरू ठेवायची असेल तर प्रवचन आणि मठांचा सहवास वाढवायला हवा. या माध्यमातूनच समाजाचा शांतीचा मार्ग सुरू होईल, असे मत प्रवचनकार श्री निजगुणी देवरू यांनी व्यक्त केले.
तनवडी (ता. गडहिंग्लज) येथे श्री कमलेश्‍वर मठातर्फे आयोजित महादासोह व ज्ञानदासोह सोहळ्याच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. नूलचे श्री भगवानगिरी महाराज, श्री गुरुदेव शरणरू यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. भगवानगिरी महाराज म्हणाले, ‘‘कमलेश्‍वर मठाची वाटचाल सामाजिक दृष्टिकोनातून सुरू आहे. योग्य नियोजन, शिस्तबद्ध अन्नदान आणि उत्तम प्रवचनातून या मठाचा उत्कर्ष होत आहे. श्री गुरुदेव देवरू यांनी स्वामीजींच्या आशीर्वादाने या भागात मोठ्या प्रमाणात भक्तिमार्ग निर्माण झाला आहे.’’
मठाचे प्रमुख उदयकुमार देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पहिल्या दिवशी नूलचे श्री लक्ष्मी शिवभजन मंडळाचे भजन झाले. दरम्यान, सकाळच्या सत्रात मिरवणूक झाली. भगवानगिरी महाराज, गुरुदेव देवरू, निजगुणी देवरू यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. श्री कमलेश्‍वर स्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन झाले. सुरुवातीला विजापूरचे श्री सिद्धेश्‍वर महास्वामीजींना आदरांजली वाहण्यात आली. स्वामीजींचा सत्कार झाला. या वेळी बसवराज आरबोळे, पांडुरंग पाटील, सिद्धाप्पा पाटील, मल्लिकार्जुन आरबोळे, सुरेश आरबोळे, अण्णासाहेब देसाई, अर्जुन सुतार, आप्पासाहेब पाटील, आप्पासाहेब देसाई, अ‍ॅड. संजय देसाई, किरण पाटील, बसवाणी पाटील, रमेश देसाई, राजू पाटील, दशरथ गुरव, आप्पासाहेब माने, महादेव माने यांच्यासह परिसरातील भाविक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com