खो- खो स्पर्धेत जयहिंद मंडळ विजेते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खो- खो स्पर्धेत जयहिंद मंडळ विजेते
खो- खो स्पर्धेत जयहिंद मंडळ विजेते

खो- खो स्पर्धेत जयहिंद मंडळ विजेते

sakal_logo
By

ich273.jpg
85603
इचलकरंजी ः बालभारत चषक खो-खो स्पर्धेतील विजेत्या जयहिंद मंडळला पारितोषिक मदन कारंडे यांच्याहस्ते दिले.
-----------
खो- खो स्पर्धेत जयहिंद मंडळ विजेते
इचलकरंजीत आयोजन; रोहना शिंगाडे सर्वोत्कृष्ट खेळाडू
इचलकरंजी, ता. २७ ः येथे झालेल्या बालभारत चषक खो- खो स्पर्धेत जयहिंद मंडळाने विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात सीआरएसएसयु संघाचा ४ गुणांनी पराभव केला. कोल्हापूर खो खो असोसिएशनच्या मान्यतेने पुरुष गट खुला गटात ही स्पर्धा झाली.
शिवछत्रपती क्रीडा संघ व इलेव्हन संघ या संघांना विभागून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.
उपांत्य फेरीमध्ये जयहिंद मंडळाने शिवछत्रपती क्रीडा संघावर २ गुणांनी तर सीआरएसएसयु संघाने इलेव्हन संघावर संघावर ५ गुणांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान जयहिंद मंडळाचा खेळाडू रोहन शिंगाडे, अंतिम सामन्यातील सामनावीर विजय हजारे (जयहिंद मंडळ), उत्कृष्ट सरंक्षक अवधूत पाटील (सीआरएसएसयु) उत्कृष्ट आक्रमक मजहर जमादार (जयहिंद मंडळ), उत्कृष्ट डायर सुशांत कलढोणे (सीआरएसएसयु), फेअर प्लेअर अमित कुरकले (इलेव्हन संघ) यांना वैयक्तीक पारितोषिके दिली.
स्पर्धेत १६ सामनावीर पारितोषके दिली. तांत्रिक समिती सदस्य अनिल गांजवे व पंच मंडळ प्रमुख संभाजी बंडगर यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा झाल्या. बालभारत क्रीडा मंडळाच्या ज्येष्ठ खेळाडूंचा सत्कार राहुल खंजीरे यांच्याहस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. स्पर्धेवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने, शिरोळचे नगरसेवक अरविंद माने, सातारा महावितरणचे कार्यकारी अभियंता सागर मारुळकर, उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अजय लोंढे, माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांनी भेट दिली. पारितोषिक वितरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांच्याहस्ते केले. माजी न्यायाधीश डी. एस. हातरोटे, जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष राजन उरुणकर, अध्यक्ष उल्हास सूर्यवंशी, डी. एन. कौंदाडे, आनंदा कौंदाडे उपस्थित होते.
संयोजन उत्कर्ष सूर्यवंशी, सुशील चव्हाण, विरेन खंजीरे, मिलिंद नवनाळे, योगेश कौंदाडे, अमोल सूर्यवंशी, कार्तिक बचाटे, महेश कोरवी, ओंकार धुमाळ, अमित पाटील, विकास निपाणे, महेश चौगुले, संभाजी जाधव, केतन अवलकी, राजू पाटील, युवराज किल्लेदार, तुषार सोलगे, सौरभ शिंदे, बंडोपंत फाटक, ऋषीकेश भिसे, सुशांत रानभरे यांनी केले.