गडहिंग्लजमध्ये राजभाषा दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजमध्ये राजभाषा दिन उत्साहात
गडहिंग्लजमध्ये राजभाषा दिन उत्साहात

गडहिंग्लजमध्ये राजभाषा दिन उत्साहात

sakal_logo
By

शिवराजमध्ये मराठी भाषा गौरव दिन
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात मराठी विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा झाला. कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांच्या हस्ते झाले. मराठी विभागप्रमुख डॉ. मनमोहन राजे यांनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या साहित्यातून दु:खितांच्या वेदना, तत्कालीन जीवन व्यवस्थेतील सामन्यांची होणारी कोंडी व्यक्त केल्याचे सांगितले. यावेळी अरुणा सावंत, प्राजक्ता हजारे, स्वाती कांबळे यांनी तयार केलेल्या कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्यकृतीच्या भित्तीपत्रकाचे उद्‍घाटन प्राचार्य कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. एन. बी. एकिले, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, के. टी. कुंभार, स्नेहल येजरे, अंकिता जोंधळे, श्रद्धा पाटील, किरण गुंडली उपस्थित होते. डॉ. श्रद्धा पाटील यांनी स्वागत केले. प्राजक्ता हजारे यांनी प्रास्ताविक केले. अरुणा सावंत यांनी आभार मानले.
---------------------
85638
ुगडहिंग्लज : मराठी राजभाषा दिनानिमित्त निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मंगलकुमार पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. यावेळी डॉ. दत्ता पाटील, डॉ. नीलेश शेळके उपस्थित होते.

‘घाळी’मध्ये राजभाषादिनी व्याख्यान
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त डॉ. दत्ता पाटील यांचे व्याख्यान झाले. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉ. पाटील यांनी मातृभाषा ही ज्ञानभाषा म्हणून पुढे आल्यास तिची वाढ व विस्तार नक्कीच होईल, असा विश्‍वास व्यक्त केला. डॉ. नीलेश शेळके यांनी स्वागत केले. निबंध स्पर्धेतील यशस्वी प्रवीण पाटील, गौरी कुरबेट्टी, सानिया चिटणीस, पूनम मोरे, सानिका शिंत्रे, प्रणवी शिंदे या विजेत्यांना पारितोषिक वितरण झाले. वंदना खोराटे यांनी आभार मानले. दत्ता वाघमारे, विश्‍वनाथ पाटील, पूजा पाटील, फुलराणी रजपूत, राजश्री म्हंकावे, दयानंद पाटील, विलास प्रधान, आशुतोष परीट, राहुल वारके, महेश पाटील, प्रमोद पुजारी आदी उपस्थित होते.
-------------------
85636
वडरगे : जीवन शिक्षण विद्या मंदिरात चैत्राली आडावकर हिने कविता वाचन केले. यावेळी विलास माळी, सुलोचना चिंदके, वैशाली कोष्टी, सुनील पोटे उपस्थित होते.

वडरगेत काव्य वाचनाचा उपक्रम
गडहिंग्लज : वडरगे येथील जीवन शिक्षण विद्या मंदिरात मराठी राजभाषा दिनानिमित्त काव्य वाचनाचा उपक्रम राबविण्यात आला. कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक व कवी विलास माळी यांच्या हस्ते झाले. वाढदिवसानिमित्त प्रत्येक मुलांनी शाळेला पाच पुस्तके भेट देण्याचे आवाहन केले. साक्षी सावंत, चैत्राली आडावकर, सायली जावळे, नूतन गायकवाड यांनी कवितांचे वाचन केले. सतीश तेली यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगितले. माळी, सुलोचना चिंतके यांनीही कुसुमाग्रजांच्या कवितांचे वाचन केले. वैशाली कोष्टी यांनी सूत्रसंचालन केले. सुनील पोटे यांनी आभार मानले.
-------------------
‘ओंकार’मध्ये राजभाषा दिनी विविध स्पर्धा
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयात मराठी, हिंदी व ग्रंथालय विभागातर्फे मराठी राजभाषा गौरव दिन साजरा झाला. यानिमित्त कौशल्य विकास उपक्रमांतर्गत सूत्रसंचालन, बातमी लेखन, अहवाल लेखन, उद्‍घोषणा प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे उद्‍घाटन झाले. प्र. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. संचालक आण्णासाहेब देवगोंडा प्रमुख पाहुणे होते. यानिमित्त झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण झाले. भित्तीपत्रकाचे प्रकाशन संचालक विठ्ठल भमानगोळ यांच्या हस्ते झाले. दिनकर खवरे यांनी मराठी राजभाषा दिनाविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्ष राजन पेडणेकर यांचे प्रोत्साहन मिळाले. भीमराव शिंदे यांनी प्रास्ताविक, तर डॉ. संजीवनी पाटील यांनी स्वागत केले. सानिका घोटणे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शर्मिला घाटगे यांनी आभार मानले. यावेळी कविता पोळ, क्रांती शिवणे, समीर कुलकर्णी, धर्मवीर क्षीरसागर आदी उपस्थित होते.